चि. श्रेयश जॉन त्रिभुवन यांचा वाढदिवस
जि.प.प्रा.शाळा,अस्तगांव येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. याप्रसंगी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथील विद्यार्थ्यांना वही व खाऊचे वाटप करण्यात आले,त्याच बरोबर इयत्ता दुसरीच्या दोन वर्गासाठी चप्पल व शूज ठेवण्यासाठी चप्पल स्टॅन्ड बनवून देण्यात आले, तसेच यावेळी श्रेयस व त्यांच्या पालकाचा सत्कार करून व केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अस्तगावचे मुख्याध्यापक श्री. सहाने सर,1नंबर सोसायटी चेअरमन श्री.विजयराव गोर्डे पाटील,ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस श्री.नंदूभाऊ जेजुरकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव सापते,अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष हेमंतराजे गोर्डे,जेष्ठ नेते बशीर भाई शेख,काँग्रेस नेते शरदराव चोळके, आरपीआय नेते अनिल त्रिभुवन,समद भाई शेख, आरपीआय शहराध्यक्ष महेश त्रिभुवन,भीमा त्रिभुवन,मिथुन संसारे,सौरभ त्रिभुवन,राकेश त्रिभुवन, अशोक गोडगे,कमलेश त्रिभुवन,राष्ट्रीय श्रीराम संघाचे उपाध्यक्ष महेश त्रिभुवन, वादे पाटील,श्री.कर्डिले सर,श्री.गमे सर,श्री.सगभोर सर,श्रीमती.कहाणे मॅडम,श्रीमती.गीते मॅडम,श्रीमती. जाधव मॅडम,श्रीमती.पंडित मॅडम,श्रीमती.भुतकर मॅडम,श्रीमती. दातीर मॅडम,श्रीमती.निळे मॅडम,मोरे मॅडम,श्री.जॉन त्रिभुवन सर आदीसह मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद प्रा.शाळेचे विद्यार्थी व मित्रपरिवार उपस्थित होते.
यावेळी १नंबर सोसायटीचे चेअरमन श्री.विजयराव गोर्डे पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगावचे, मुख्याध्यापक श्री.सहाने सर,ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नंदूभाऊ जेजुरकर,भाजपा दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष हेमंतराजे गोर्डे,श्री कर्डिले सर आदींची भाषणे झाली, श्रेयशच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक व श्रेयसचे व त्याच्या पालकांचे कौतुक करण्यात आले.
*श्री.गमे सर यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तर श्री.जॉन त्रिभुवन सर यांनी सर्वांचे आभार मानले.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा