गुरुवार, २३ जुलै, २०२६

लोकशाही, संविधान व विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ उद्या राहाता तालुका एकवटणार

लोकशाही, संविधान व विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ उद्या राहाता तालुका एकवटणार

राहाता, 
 : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज व पोलिस कारवाईच्या निषेधार्थ तसेच लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता वीरभद्र मंदिर प्रांगण, राहाता येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निषेध सभेत राहाता तालुक्यातील विद्यार्थी, पालक, युवक, शेतकरी, व्यापारी, महिला, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभेमध्ये लोकशाही मूल्ये, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांबाबत भूमिका मांडण्यात येणार असून, जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांची माहिती उपस्थितांना देण्यात येणार आहे. तसेच लोकशाही मार्गाने निषेध नोंदवून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांना पाठिंबा व्यक्त करण्यात येणार आहे.
राहाता तालुक्यातील विद्यार्थी, पालक, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांच्या वतीने तालुक्यातील सर्व नागरिकांनी या निषेध सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...