स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांचे हस्ते डेबूजी प्रतिष्ठाण यांच्या वधुवर परिचय मेळावा पत्रिकेचे प्रकाशन संपन्न.:
डेबूजी प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य व रेशीमगाठी वधुवर मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून नोव्हेंबर महिन्यात शिर्डी येथे परीट / धोबी समाजाचा वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या परिचय मेळाव्यात उच्चशिक्षित असलेले, नसलेले, लॉन्ड्रीधारक, शेतकरी, इतर व्यावसायिक, विधवा, विधुर, घटस्फोटीत या सर्वांना प्रवेश असणार आहे. साईबाबांच्या पावनभूमीत हा वधुवर परिचय मेळावा असल्याने साईबाबांच्या आशीर्वाद निश्चित वधूवरांना मिळतील.
डेबूजी प्रतिष्ठाणच्या वतीने नुकतेच या मेळाव्याचे जाहिरातीचे पत्रक तयार करण्यात आले असून मंजूर येथील सिद्धेश्वर देवस्थानचे महंत श्री श्री 1008 परीब्रजीकाचार्य, महाराष्ट्र पिठाधीशश्वर, अनंत विभूषित, दत्तात्रयरत्न महामंडलेश्वर, प. पु. स्वामी शिवानंदगिरिजी महाराज यांच्या हस्ते त्या पत्रकाचे प्रकाशन करून आयोजकांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. महाराजांनी या सामाजिक उपक्रमास भरभरून शुभाशीर्वाद दिले.
या वधुवर परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वधुवर रजिस्ट्रेशन फी ही 500 रुपये असून पालकांची उपस्थिती फी ही 100 रुपये असेल. रजिस्ट्रेशन व पालक फी ही श्री. सुधाकर वाघ यांच्या 9860075459 या गुगल पे नंबरवर पाठवावी. व बायोडाटा, फोटो आणि फी भरल्याचा स्क्रीनशॉट श्री. राजेंद्र फंड यांच्या 9881085671 या मोबाईल नंबरवर पाठवावा. या वधुवर मेळाव्यासाठी वधुवर व सोबत पालक यांची उपस्थिती आवश्यकच आहे. वधुवर यांना आठवडाभर अगोदर सर्व बायोडाटा कॉम्प्युटर प्रिंट डेबूजी प्रतिष्ठाणच्या ग्रूपवर पहावयास मिळेल. म्हणजे चॉइस करणे सोपे होईल. वधुवर मेळाव्याचे ठिकाणी वधू आणि वर व त्यांचे पालकांना चर्चा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. असाच उपक्रम आमचे सहआयोजक रेशीमगाठी वधुवर मंडळ पुणे यांनी मागील वर्षी राबविल्याने आतापर्यंत 30 विवाह जुळले गेले आहेत.
डेबूजी प्रतिष्ठाण व रेशीमगाठी वधुवर मंडळ पुणे यांचे समन्वयाने शिर्डी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या वधुवर परिचय मेळाव्याचे रजिस्ट्रेशन सुरू होताच महाराष्ट्रभरातून परीट / धोबी समाजातील पालकांनी आपल्या पाल्याचे रजिस्ट्रेशनसाठी नावनोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.
जास्तीत जास्त वधुवर यांनी या वधुवर परिचय मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक संस्थापक श्री. राजेंद्र फंड,
अध्यक्ष श्री. सुनील निकम, उपाध्यक्ष श्री. माधवराव देसाई,खजिनदार श्री. सुधाकर वाघ, आयोजक श्री. अनिल हुपरीकर अध्यक्ष रेशीमगाठी वधुवर मंडळ पुणे, मार्गदर्शक श्री. दिगंबर हौसारे सो. जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था पुणे, सहसचिव श्री. अनिल देसाई , सहखजिनदार श्री. विलासराव रोकडे, श्री. किशोरजी गवळी उपकार्यकारी अभियंता, साईबाबा संस्थान शिर्डी,डॉ. गणेश वाघ, श्री. सोपानराव भागवत, श्री. योगेश रोकडे, श्री. साईनाथ हजारे, श्री महेश यादव, श्री. कृष्णा शिंदे, श्री. पंकज राऊत, श्री. शरद राऊत, सौ. सुषमा अमृतकर, सौ. सुनीता राक्षे, सौ. शिल्पा दळवी, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल गवळी हायकोर्ट संभाजीनगर, कायदेविषयक सल्लागार श्री. विजय क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार श्री. महादेव दळे, पत्रकार राजेंद्र देसाई, पत्रकार श्री. योगेश सगर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा