शुक्रवार, २४ जुलै, २०२६

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार - खा.भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार - खा.भाऊसाहेब वाकचौरे 

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री मा. ना.अमित भाई शाह यांची सदिच्छा भेट घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजित विकासासाठी ४७ केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित विविध विकास प्रस्तावांचे एकत्रित निवेदन सादर केले असल्याची माहिती शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. यापुढे शिर्डी लोकसभा विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत करण्याचे आश्वासन ना.शहा यांनी दिले असल्याने विकासाचा वेग दुप्पट होणार असल्याची खात्री खा.वाकचौरे यांनी दिली.
या निवेदनामध्ये शिर्डी अंतर्गत विमानतळाचा विस्तार, रेल्वे प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, औद्योगिक विकास, रोजगार, आदिवासी विकास, स्मार्ट सिटी, आदर्श गाव, युवा रोजगार, कृषी व्यवसाय, CSR उपक्रम तसेच लोकसभा क्षेत्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. यापुढे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या साथीने शिर्डी मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात विकासाची ब्लु प्रिंट तयार करणार असून आमच्या जनहित ऍप‘वर जनतेकडून अपेक्षित कामांचे अभिप्राय मागवत आहोत. निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर जनतेप्रति समर्पित होऊन माझ्या खासदारकीचे प्रत्येक पाऊल हे सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असणाऱ्या कामातून पुढे टाकणार असल्याचे खा.वाकचौरे यांनी ठामपणे सांगितले.
मा.ना.अमित भाई शहा यांना शिर्डी भेटीचे आणि श्री साई दर्शनाचे निमंत्रण दिले असून शिर्डीबद्दल त्यांनी गौरोदगार काढले आणि महाराष्ट्रात शेतीविषयक धोरणाबाबत संपूर्ण माहिती घेतली. केंद्रीय सहकार क्षेत्रात मा.ना.शहा साहेबांनी महत्वकांक्षी बदल केल्याने महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे शेवटी खा.वाकचौरे यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...