तरुणांनी व्यसनाच्या विळख्यापासून दूर रहावे – पो.नि. संभाजी गायकवाड
पोहेगाव :
- रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग.र. औताडे पाटील विद्यालय पोहेगाव येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान साजरे करण्यात आले.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत कोपरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती आवश्यकता याविषयक सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच सायबर गुन्हेगारी , सोशल मिडीयाचा अति वापर केल्यामुळे होणारे संभाव्य धोके , भारतीय दंड संहिता मधील विविध कायदे, विद्यार्थी दशेत व्यायाम, शिस्त यांचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच संकटसमयी ११२ क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोहेगाव गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी प्रारंभी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री नंदकुमार औताडे पाटील यांनी पो.नि. संभाजी गायकवाड यांचे तर मा. श्री मधुकरराव औताडे पाटील यांनी पोहेगावचे पोलीस पाटील जयंत रोहमारे यांचे व उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री महेंद्र काळंगे यांनी केले विद्यालयाचे प्राचार्य श्री विजयजी भोसले यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुनील वाघमारे श्री. राठोड, श्री सांगळे ,श्री पवार, श्री. लहिरे , श्री.सूर्यवंशी , श्री.पाटील, श्री पडवळे, श्री भारमल , श्री वराडे श्रीमती बागुल, श्रीमती वायाळ,यांचे सह सर्व शिक्षक , शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा