सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

शिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे श्री साईबाबा संस्थान च्या वतीने तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्ती भावाने साजरा

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढीपरंपरेनुसार श्री साईबाबा संस्थानच्या वतीने तुळशी विवाह सोहळा श्री द्वारकामाई मंदिरात मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते तुळशी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला.


 कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश पूजनाने झाली, त्यानंतर तुळशी-विष्णू विवाह विधी, आरती, नैवेद्य दाखविणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख श्री. विष्णू थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ, तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...