बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

राहाता पिपल्स पतसंस्थेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट — विश्वास व विकासाचा एक नवा अध्याय!

राहाता पिपल्स पतसंस्थेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट — विश्वास व विकासाचा एक नवा अध्याय!

राहाता शहरातील प्रतिष्ठित “राहाता पिपल्स नागरी सहकारी पतसंस्था ” ही केवळ आर्थिक संस्था नसून, शहराच्या विकासाचा नाडीसमान धागा आहे. या संस्थेला आज एक विशेष ओळख लाभली — अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री  व शिर्डी मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बँकेला सदिच्छा भेट देत, संस्थेच्या कार्याचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या प्रसंगी चेअरमन भाऊसाहेब चौधरी, व्हा. चेअरमन डॉ. संतोष मैड, डॉ स्वाधीन गाडेकर,कैलास सदाफळ,बाळासाहेब सदाफळ,दत्ता सदाफळ,आसिफ मन्सुरी,प्रतीक चौधरी,तसेच संचालक मंडळ सदस्य सतिश खांबेकर, बाळासाहेब सोनटक्के, राजूभाई पठाण, देवराम गाडेकर, सदाशिव बोठे, मनीषा गोर्डे, उर्मिला निकाळे, बेबीताई सदाफळ, संदिप तुपे, विलास साठे, रावसाहेब भागवत, संजय देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे मॅनेजर पुरुषोत्तम गुंजाळ, कॅशियर अश्रफ शेख,वरिष्ठ अधिकारी रवींद्र वैजापूरकर, तसेच क्लार्क साईगणेश गव्हाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी संस्थेच्या कार्यपद्धती, पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन व ग्राहकाभिमुख सेवांबद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी संचालक मंडळाच्या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, “राहाता पिपल्स बँक ही ग्रामीण सहकार क्षेत्रातील आदर्श ठरावी, अशीच अपेक्षा आहे. आर्थिक शिस्त, विश्वास आणि पारदर्शकता या तीन तत्त्वांवर संस्थेचा पाया अधिक मजबूत करावा.”

या भेटीला रघुनाथ बोठे, डॉ. स्वाधीन गाडेकर, मुकुंद (नाना) सदाफळ ,कैलास बापू सदाफळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीने राहाता पिपल्स पतसंस्थेच्या कार्याला नवा उर्जा-संचार मिळाला असून, पतसंस्था आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...