बुधवार, २ जुलै, २०२५

साईयोग फाउंडेशन द्वारे एकरुखे येथे वृक्षारोपण.....

साईयोग फाउंडेशन द्वारे एकरुखे येथे वृक्षारोपण.....




न्यायाधीश पदी निवड झालेले ऋषी आभाळे यांचा केला हृद्य सत्कार....
राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे आयोजित वृक्षारोपण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी एकरुखे येथील अमरधाम  येथे गावातील मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच बंधाऱ्याच्या कडेला बालकुवा या जातीच्या बांबूचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य व निवृत कृषी अधिकारी अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानातील वृक्षारोपण केलेल्या झाडांची पुढील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे.यापुढेही येथे वृक्षारोपण करण्याचा साईयोग फाऊंडेशनचा मानस आहे.




याप्रसंगी एकरूखेचे भूमिपुत्र ऋषीकेश आभाळे यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल फाउंडेशन द्वारे फेटा बांधून साईशाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच राहाता पंचायत समितीचे माजी उपसभापती जालिंदर गाढवे,मार्केट कमिटीचे संचालक देवेंद्र भवर,गणेश कारखान्याचे संचालक मधुकर सातव,अनिल सातव व पत्रकार ज्ञानेश्वर जोरे यांचाही सत्कार करण्यात आला.
एकरुखे ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला.
कृषी अधिकारी धनंजय सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करत सूत्रसंचालन केले.नवनियुक्त न्यायाधीश ऋषिकेश आभाळे यांनी सत्काराला उत्तर देताना वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करत साईयोग फाउंडेशनच्या कार्याच्या गौरव केला.जालिंदर गाढवे व अनिल सातव यांनीही मनोगत व्यक्त केले.शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले 
यावेळी राहाता नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ,एकरुखे चे माजी सरपंच भास्कर आभाळे व बापूसाहेब आग्रे तसेच गणेश थोरात,रघुनाथ बोर्डे,ग्रा.सदस्य जगन्नाथ सोनवणे,ललित मुनावत,विलास सातव, बाबासाहेब बिलबिले,संजय तुपे,जयसिंग सातव,संजय गाढवे,ज्ञानेश्वर फटांगरे,वाल्मीक सातव,जयवंत गायधने,योगेश सातव,रावसाहेब कार्ले,आप्पा तुपे,मेजर सातव,नितीन गुरु,भरत दवंगे,उज्वला गाडेकर,माधुरी माळवे,ॲड गोरख दंडवते,विलास वाळेकर,संजय बाबर,प्रकाश पुंड,संदीप डांगे,मोहन तांबे,परमेश चव्हाण,विठ्ठल निर्मळ,रवींद्र धस,विष्णू गाडेकर,दीपक गाडेकर,बबलू फटांगरे,दीपक दंडवते,ज्ञानेश्वर आरणे,भागवत वाघमारे,सिताराम बावके,नारायण गाडेकर,प्रशांत माळवे,प्रकाश बेंद्रे,बाळासाहेब तारगे,अंकुश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.नाश्ता व चहापानाने समारोप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...