गुरुवार, ३ जुलै, २०२५

शेतकरी प्रश्न आणि नागरिकांच्या अडवणुकीविरोधात काँग्रेस आक्रमक*सौ. प्रभावती घोगरे यांचे तहसीलदारांना निवेदन

शेतकरी प्रश्न आणि नागरिकांच्या अडवणुकीविरोधात काँग्रेस आक्रमक*
सौ. प्रभावती घोगरे यांचे तहसीलदारांना निवेदन


राहाता 
राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी व तहसील कार्यालयातील अनागोंदीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, आज काँग्रेस नेत्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राहाता तहसीलदारांना निवेदन सादर केले.

तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची वेळेवर अनुपस्थिती

शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची होत असलेली अडवणूक

तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर युरियाची तीव्र टंचाई

राहाता तालुक्यातील अनेक गावांमध्ये युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच पावसाचे आगमन विलंबाने झाल्यामुळे खरीप हंगामाची वेळ निघून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सौ. प्रभावती घोगरे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर काँग्रेस पक्ष आणि शेतकरी वर्गाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.


तहसीलदार शासकीय कामात व्यस्त असल्यामुळे हे निवेदन नायब तहसीलदार श्री. हेमंत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले.

या प्रसंगी राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज लोंढे, विक्रांत दंडवते,सचिन चौगुले, उत्तमराव घोरपडे, आप्पासाहेब घोगरे, भास्करराव आहेर, दिलीप घोगरे, उत्तमराव मते, सदाशिव गाडेकर, नितीन सदाफळ, अमोल आरणे, वसंतराव काळे, पोपट घोगरे, अण्णा तुपे, संपतराव आहेर, सचिन उर्फ मुन्ना आहेर, श्याम घोगरे, सुहास आहेर, गौतमजी आहेर यांच्यासह महिला प्रतिनिधी सौ.वर्षाताई घोगरे आणि अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...