श्री गणेशनगर विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेतील मार्च 2025 मध्ये संपन्न झालेल्या एस एस सी परीक्षेचा विद्यालयाचा *शेकडा निकाल 84.94* एवढा लागला .
या विद्यालयामध्ये विशेषता गोरगरीब, दीन दलित,कष्टकरी वर्गातील मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून विद्यालयाने नावलौकिक मिळवले आहे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे
प्रथम मोटे श्वेता गणेश 91.80
द्वितीय गाढवे दर्शन विलास 89.60
तृती भालेराव दर्शन दत्तात्रय 86.60
चतुर्थ बिरदोडे तेजस उत्तम 86.40
पाचवा साळुंके अर्जुन कैलास 81.60 गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण -12
प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण- 26
द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण- 25
पास क्लास उत्तीर्ण -16 अशाप्रकारे यश मिळून विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, स्कूल कमिटीचे सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे,
जयाभाऊ काले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे, सरपंच सुनिताताई सोपानराव कासार, उपसरपंच राजेंद्र पाटील गाढवे,वाल्मीक पाटील गाढवे, मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा