बुधवार, १४ मे, २०२५

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

राहाता 
 धर्मरक्षक संभाजी महाराजांचा जीवनपट हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवले की स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यापेक्षा मोठे काहीही नाही. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की कितीही संकटे आली तरी धैर्याने आणि बुद्धिमत्तेने त्यांचा सामना करावा. त्यांचे कार्य आणि शौर्य आजही लोकांच्या मनात जीवंत आहे. अशी भावना भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती साजरी करताना बोलतना व्यक्त केली. भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली यावेळी प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप,नरेंद्र पिपाडा,अशोकराव सदाफळ,महावीर पिपाडा,निखील पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते. 


यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ.राजेंद्र पिपाडा पुढे म्हणाले की, संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती - मुघलांचा सततचा हल्ला, अंतर्गत गटबाजी आणि विश्वासघात. तरीही त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला आणि मराठ्यांचा आत्मसन्मान जपला. त्यांनी औरंगजेबाच्या विशाल सैन्याविरुद्ध लढताना आपल्या रणनीती आणि शौर्याने सैन्याचे मनोबल उंच ठेवले. संभाजी महाराजांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा स्वाभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा. जेव्हा त्यांना मुघलांनी पकडले, तेव्हा औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची आणि स्वराज्य सोडण्याचा प्रस्ताव मांडला. पण संभाजी महाराजांनी मृत्यूला कवटाळले, पण स्वाभिमान आणि धर्माला तिलांजली दिली नाही. त्यांचा बलिदानाचा प्रसंग आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करतो.
        छत्रपती  संभाजी महाराजांचे बलिदान हे केवळ मराठ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवले की स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यापेक्षा मोठे काहीही नाही. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की कितीही संकटे आली तरी धैर्याने आणि बुद्धिमत्तेने त्यांचा सामना करावा. की छत्रपती  संभाजी महाराज हे एक असे रत्न होते, ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे स्मरण करणे म्हणजे स्वातंत्र्य, शौर्य आणि स्वाभिमान यांचा आदर करणे होय. आपण सर्वांनी त्यांच्या या त्यागातून प्रेरणा घेऊन आपल्या कर्तव्याप्रती निष्ठावान राहावे. यावेळी उपस्थित सर्वांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.
जय हिंद! जय महाराष्ट्र!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...