शनिवार, १ मार्च, २०२५

महाशिवरात्रीनिमित्त श्री खंडोबा देवस्थान वाकडी खंडोबाची मंदिर येथे आरती व खिचडी प्रसाद वाटप

महाशिवरात्रीनिमित्त श्री खंडोबा देवस्थान वाकडी खंडोबाची मंदिर  येथे आरती व खिचडी प्रसाद वाटप


धनगरवाडी 

 राहाता तालुक्यातील वाकडी खंडोबाची  येथील प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त  खिचडी प्रसाद वाटप जय मल्हार आरती मंडळांनी  वाकडी खंडोबाची  येथे आयोजित करून सकाळची आरती झाल्यानंतर येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, हर हर महादेव या घोषणा देऊन आरतीची सांगता झाली. खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले.याप्रसंगी समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. खिचडी प्रसादाचा लाभ घेतला.
   तसेच महाशिवरात्री  निमित्त जय भोले ग्रुप वाकडी (खंडोबाची )च्या वतीने महाप्रसाद खिचडी वाटप करण्यात आले. जय भोले ग्रुपचे तिसरे वर्ष असून भक्तिमय वातावरणामध्ये प्रसाद वाटप करण्यात आले.

     महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री सोमेश्वर महादेव व काकडाई मित्र मंडळ व भजनी मंडळ यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली.
    श्री. सोमेश्वर महादेव मंदिर व श्री. काकडाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शिवलीला अमृत पारायण सोहळा निमित्त महाशिवरात्र भजन, खिचडी प्रसाद आयोजन करण्यात आले.खिचडी प्रसादाचा  व भजनाचा शिवभक्तांनी  आनंद घेतला. श्री. सोमेश्वर महादेव , श्री. काकडाई मित्र मंडळ,व भजनी मंडळ चितळी रोड समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशी वाकडी खंडोबाची यांनी आयोजन केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...