वृक्षारोपण करून प्रांताधिकारी माणिक आहेर यांचा वाढदिवस साजरा....
साईयोग फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.....
शिर्डीचे प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर यांचा वाढदिवस राहता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.सुरुवातीला राहाता नगरपालिकेच्या योग भवन मधे राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे व साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य विठ्ठल निर्मळ यांच्या हस्ते फेटा बांधून शाल देवून सन्मानित करण्यात आले.तसेच गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अरुण मोकळ यांचाही वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.दोघांच्या हस्ते साकुरी अमरधाम शेजारी १५ फुटी पिंपळाचे रोपण करण्यात आले.तत्पूर्वी महिला सदस्यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले.
जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावनापर म्हणाले साईयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात माणिकराव आहेर व इतर उच्च पदस्थ अधिकारी जेव्हा आपला अधिकारपणा बाजूला ठेवून सहभागी होतात तेव्हा आमच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढीला लागतो व उत्तम कार्य होते.राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे म्हणाले आहेर साहेब यांनी आपल्या हुशार,संयमी व शांत स्वभावाने आपल्या कार्यातून परिसराचा कायापालट केला.साईयोग फाउंडेशनला सरकारी अधिकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे शासनाला अपेक्षित असलेले पर्यावर्णाचे कार्य उत्तम होत आहे.साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापुसाहेब पानगव्हाणे म्हणाले साईयोग फाउंडेशन तसेच माझ्या वैयक्तिक वाटचालीत आहेर साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.सहकाऱ्यांची साथ,पत्रकार बंधूंची शाबासकीची थाप व आपल्यासारख्या अधिकाऱ्यांचे सहकार्य हेच साईयोग फाउंडेशन करत असलेल्या कार्याच्या यशाचे गमक आहे.
आपल्या सत्काराला उत्तर देताना माणिकराव आहेर म्हणाले साईयोग फाउंडेशनचा निसर्गाप्रती जिव्हाळा असल्याने पर्यावरणाचे काम समर्पित भावनेने होत आहे.तसेच पहाटेच्या योग साधनाच्या कार्यामध्ये सातत्य असून महिलांच्या सहभाग होणे ही आनंदाची गोष्ट आहे.आज आपण माझा केलेला हा वाढदिवस आयुष्यात कायम लक्षात राहील.शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब सोनवणे,किरण वाबळे,राजुभाई पठाण,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,ॲड गोरख दंडवते,ॲड दत्तात्रय धनवटे,रवींद्र बोठे,विजय आवारे,अशोक साठे,भाऊसाहेब बनकर,मोहन तांबे,विलास वाळेकर,संदीप डांगे,संजय बाबर,बबलू फटांगरे,प्रकाश पुंड,संजय वाघमारे,राजु वायकर,अनिल सातव,दीपक दंडवते,व्यंकटेश अहिरे,राजेंद्र बांगर,पांडुरंग गायकवाड,ज्ञानेश्वर आरणे,रंगनाथ सदाफळ,नामदेव गवते,परमेश चव्हाण,शिवाजी पोटे,विष्णू गाडेकर,उमेश लुटे,बबन लुटे,दीपक गाडेकर,अनिल कुंभकर्ण,सुजित सूर्यवंशी,प्रवीण वाघचौरे,अर्जुन चव्हाण,सलमान शेख,प्रभाकर नावकर,प्रसाद लांडगे,रवी निकाळे,गोविंद निकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा