संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५
शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन
शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत - डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन
जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या क्षमता संवर्धनाची काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर
जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या क्षमता संवर्धनाची काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, त्यासाठी सर्व जुन्या उपकेंद्रांचे आणि वाहिन्यांचे सविस्तर सर्वेक्षण करून आवश्यकतेनूसार बदल करण्यासाठी तातडीने काम सुरू करावे. नागरिकांच्या समस्या कमी कशा होतील यासाठी संवेदनशीपणे काम करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते . बैठकीस महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता एस.बी.भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, लवकरच राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, अर्थसंकल्पात जिल्ह्यातील विद्युत वितरण कंपनीचे प्रलंबित प्रस्ताव समाविष्ट व्हावे यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवावे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा करताना अनियमिततेच्या तक्रारी आहेत. सध्याच्या उपकेंद्राचे सक्षमीकरण आणि नवे प्रस्तावित उपकेंद्रांची कामे झाल्यास विजेची समस्या दूर करता येईल. नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही जनतेशी संबंधित योजना व कामांची माहिती द्यावी.
विद्युत उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी आणि त्यानुसार कामे वेगाने पूर्ण करण्यात यावी. गतवर्षी जिल्ह्याला विद्युत रोहित्रासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला होता. या निधीचा उपयोग करून नागरिकांच्या समस्या वेळेत दूर होतील याची दक्षता घ्यावी.
विद्युत देयकांबाबत तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेचा अधिक उपयोग करावा. अशा तक्रारींबाबत कालमर्यादेत कार्यवाही करावी. घराचा आकार, एकूण वीज वापर लक्षात घेऊन त्यापेक्षा अधिकचे देयक येणार नाही याबाबत उपाय योजावेत.
अहिल्यानगर, शिर्डी, संगमनेरमधील दाट वस्ती, शाळा, बाजारपेठेच्या ठिकाणी भूमिगत वाहिन्यांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करू असेही श्री.विखे पाटील म्हणाले. अतिक्रमण काढलेल्या भागातील विद्युत खांब स्थलांतरित करण्याबाबत माहिती घेण्यात यावी, असे पालकमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची योग्य माहिती विविध माध्यमाद्वारे नागरिकांना देण्यात यावी. प्रधानमंत्री कुसुम-बी मागेल त्याला कृषी पंप योजनेअंतर्गत सर्वाधिक अर्ज जिल्ह्यातून असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत २ हजार ३५६ मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असून त्यासाठी ११ हजार ७८६ एकर आवश्यक आहे. त्यापैकी ३ हजार ३९२ एकर क्षेत्र मंजूर झाले आहे. त्याद्वारे ५०८ मेगावॉट वीज निर्मिती होऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सौर विद्युत निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने जागा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.बैठकीत महापारेषण आणि महावितरणशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
ठेंगबाबा यात्रेनिमित्त धनगरवाडी ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे किर्तन
ठेंगबाबा यात्रेनिमित्त धनगरवाडी ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे किर्तन
धनगरवाडी
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे ग्रामदैवत ठेंगबाबा यात्रेनिमित्त ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन शनिवार दिनांक १/३/२०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.संध्याकाळी सात ते आठ महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. 8 ते 11 निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल .
पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने व यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ धनगरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. किर्तन हनुमान मंदिर धनगरवाडी या ठिकाणी आयोजित केले आहे .
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा व मातृभाषा आहे.असे मत व्याख्याते प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा व मातृभाषा आहे.
असे मत व्याख्याते प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
"मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्याला आहेत. तिथे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
यानिमित्त विविध प्रकारची नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेचा जागर करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
संगमनेर साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. हनुमंत माने यांचे
"मराठी असे आमुची मायबोली" या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण झाले.
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा व मातृभाषा आहे. साहित्यिकांनी मराठी भाषा, आचार व विचार यांनी समृद्ध केली आहे.
"
परी अमृतातेही पैजा जिंके"
अशा शब्दात मराठी भाषेचा महिमा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमधून गायला आहे.
संत नामदेव, संत तुकाराम यांनी आपल्या अभंगातून मराठी भाषेची थोरवी परमेश्वरचरणी वाहिली आहे.
संत एकनाथांनी भारुडातून तर शाहिरांनी पोवाड्यातून मराठी भाषा जनमानसात पोहोचवली आहे.
आणि म्हणूनच मराठी भाषा, मराठी साहित्य व मराठी संस्कृती जतन करणे आपले परम कर्तव्य आहे.
मराठी भाषेत विपुल असे ज्ञानभांडार आहे. यासाठी वाचन संस्कृती वाढविली पाहिजे. असे मौलिक विचार प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष- अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष- लक्ष्मण ढोले, दिलीप उदमले, कार्याध्यक्ष- किसन भाऊ हासे, सचिव- ज्ञानेश्वर राक्षे, खजिनदार-गिरीष ढोले, प्रसिद्ध योगाचार्य डॉ. सुधाकर पेटकर, माईंड पावर ट्रेनर विलास दिघे, दर्शन जोशी इ. मराठी साहित्य रसिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक- बाळकृष्ण महाजन, सुत्रसंचलन- अनिल सोमनी व आभार ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले.
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५
राहाता तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण उत्साहात
राहाता तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण उत्साहात
राहाता
तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी 2.0 प्रशिक्षण उत्साहात पार पडत आहे.
प्राचार्य डा. राजेश बनकर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर,जिल्हा समन्वयक श्री.अरुण भांगरे,संपर्क अधिकारी डॉ.गणेश मोरे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)भास्कर पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडुस ,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,विस्तार अधिकारी विष्णु कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.
हे पाच दिवशीय प्रशिक्षण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 1 ली ते 12 वी ला अध्यापन करणा-या शिक्षकांसाठी दिनांक 10 फेब्रुवारी ते 7 मार्च 2025 या कालावधित प.डा.व्ही.व्ही.पा.वि.लोणी व कला, विज्ञान ,वाणिज्य महविद्यालय राहाता येथे आयोजित करण्यात आले आहे.तालुका समन्वयक श्री.सुनिल लोमटे सर यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांचे सक्षमीकरण केले जाणार असुन प्रशिक्षणात एकात्मिक दृष्टीकोनाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ; राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण ,राज्य अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर,समग्र प्रगतीपत्रक,क्षमता आधारित मूल्यांकन,क्षमता आधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ,क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनिती,प्रश्ननिर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्ये,उच्चस्तरीय विचारप्रवर्तक प्रश्न,शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा 2024-25 य विषयीचे मार्गदर्शन केले जात आहे.
प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा दिनांक 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या कालावधित कला,विज्ञान,वणिज्य महविद्यालय राहाता येथे आयोजित केला असुन प्रशिक्षणास सौ.धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी भेट देवून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीचा अभ्यास करुन प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन करून प्रशिक्षणास शुभेच्चा दिल्या. सुलभक म्हणून तालुक्यातील सुनिल लोमटे,विजय देशमुख,सुरेश साबळे,नंदकिशोर भांड,सुर्यभान रहाणे,तुकाराम डापसे,बालाजी आईंदवाड,विवेक मोरे,सिध्दार्थ दिवे, दिनकर यादव,योगेश बांगर इत्यादीनी अतिशय उत्कृष्ट भुमिका पार पाडत आहेत.
शिर्डी गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी सर्व पक्षीय झालेली ग्रामसभा कौतुकास्पद तर दुहेरी हत्याकांडा तील मयत घोडे व शेजुळ परिवार यांना शासनाच्या वतीने सर्व ती मदत दिली जाईल:- नामदार शिरसाठ
शिर्डी गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी सर्व पक्षीय झालेली ग्रामसभा कौतुकास्पद तर दुहेरी हत्याकांडा तील मयत घोडे व शेजुळ परिवार यांना शासनाच्या वतीने सर्व ती मदत दिली जाईल:-
नामदार शिरसाठ
शिर्डी
काही दिवसांपूर्वी शिर्डीत साई संस्थानचे कर्मचारी सुभाष घोडे व नितीन शेजुळ यांची निर्घृण पणे हत्या तर कृष्णा देहरकर यांना गंभीर जखमी करण्यात आले अशा घटना साईंच्या नगरीत घडू नये अशा घटनेचा कायमचा नायनाट करण्यासाठी व शिर्डी गुन्हेगार मुक्त करण्यासाठी जी सर्व पक्षीय ग्रामसभा झाली ती खरो खरच कौतुकास्पद असल्याचे मत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाठ यांनी शिर्डीत धावत्या दौऱ्या प्रसंगी सांगितले आपण नगर जिल्ह्या जवळच असल्याने आपणाला शिर्डीत काय काय घडतंय याची माहिती मिळत असते माजी खासदार सुजय विखे व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी नगर पालिका व अन्य शासकीय प्रशासन यांना भिकारी हटाव ही मोहीम राबविण्याच्या योग्य सूचना केल्याने मला शिर्डीत एक ही भिकारी आढळून आला नसल्याचे त्यावेळी ते म्हणाले आपण आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत शिर्डी पोलिसांना घोडे व शेजुळ यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे सांगणार असून सदर खटला अति जलद न्यायालयात चालविण्यात यावा यासाठी ही संबंधित विभागांना आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांचा लहुजी सेनेचे रामभाऊ पिंगळे भाजपचे संजय महाजन नानासाहेब शिंदे यांच्या वतीने निवेदन देऊन सत्कार करण्यात आला.
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५
जलसाठा पाच पाटील टीम चाळीसगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालयात मिशन ५०० या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला जलबचतीचे महत्त्व समजावून उत्कृष्ट जलसंधारणाचे काम करणाऱ्या गावप्रमुखांचा सत्कार
जलसाठा पाच पाटील टीम चाळीसगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालयात मिशन ५०० या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला जलबचतीचे महत्त्व समजावून उत्कृष्ट जलसंधारणाचे काम करणाऱ्या गावप्रमुखांचा सत्कार
पुणतांबा::
. मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा संकल्पक डॉ उज्ज्वल कुमार चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने मिशन ५००कोटी जलसाठा पाच पाटील टीम चाळीसगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालयात मिशन ५०० या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला जलबचतीचे महत्त्व समजावून उत्कृष्ट जलसंधारणाचे काम करणाऱ्या गावप्रमुखांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमात पुणतांबा येथील पाच पाटील टिम विनोद धनवटे गणेश बनकर,पाराजी वरखड, बाळासाहेब भोरकडे, सतिश मगर, यांनी पुणतांबा व परिसरात जलबचतीची चळवळ उभी करुन अतिरिक्त पावसाचे वाहून जाणारे लाखो लिटर पाणी अडवून जलसाठा तयार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले म्हणून त्यांना कार्यक्रमांचे अध्यक्ष तथा कराड येथील शिवम् प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख, मा.आयकर आयुक्त डॉ. उज्ज्वल कुमार चव्हाण , श्रीकांत पायगव्हाणेसर सहाय्यक अभियंता मुंबई महापालिका, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्रोही कवी नितिन चंदनशिवे
शेखर निंबाळकर सर यांच्यासह सर्व पाच पाटील टीम चाळीसगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला, या प्रसंगी रवींद्र आमले उपसरपंच गोडेगाव, प्रकाश शेळके पाटील, रामपूर वाडी,अशोकराव आग्रे,जितेंद्र साबदे, सोमनाथ जगताप,संगम भोरकडे हे देखील उपस्थित होते
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५
स्वच्छता हीच परमेश्वराची सेवा : खंडेराव कडलग
स्वच्छता हीच परमेश्वराची सेवा : खंडेराव कडलग
राहता
राष्ट्रसंत गाडगेबाबा हे खरे राष्ट्रहित जपणारे आधुनिक संत होते. स्वतः अडाणी असून ही शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही. हे ओळखून त्यांना मिळालेली जमीन त्यांनी रयत शिक्षण संस्थेस शालेय उपयोगासाठी दिली. समाजातील अंधश्रद्धा गाडण्यासाठी त्यांनी त्या काळात सुख दुःखाप्रसंगी पाहुणे रावळे यांना दिली जात असलेले मटणाचे जेवण व दारू ही अनिष्ट प्रथा स्वतः पासून बंद करून त्याऐवजी गोड जेवण दिले. सावकाराचे कर्ज घेऊन समारंभ करू नये म्हणून प्रबोधन केले. आणि स्वच्छता हीच परमेश्वराची सेवा आहे असे दररोज कीर्तनात सांगून त्या गावची सेवा प्रथम स्वच्छतेने व नंतर प्रबोधनाने करत असे उदगार महाराष्ट्र राज्य परीट/ धोबी समाजाचे होणारे नूतन प्रदेशाध्यक्ष श्री खंडेराव कडलग यांनी काढले.
राहाता येथील साईयोग मंडळ, राहाता ग्रामस्थ, दहीगांव ग्रामस्थ, राहाता तालुका परीट धोबी सेवा मंडळ , लायन्स क्लब राहाता सह्याद्री व पुणे येथील संस्कार प्रतिष्ठान कार्यकर्ते मार्फत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे 149 व्या जयंतीप्रसंगी आयोजित केलेल्या सद्गगती घाट स्वच्छता मोहीमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांनी केले. ॲड. दत्तात्रय धनवटे, यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर परीट धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री. खंडेराव कडलग, साईयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राहाता नगरपालिकेचे. स्वच्छता अँबेसेडर डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे संस्थापक ला. विनोद गाडेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. नितीनभाऊ कापसे तर दहीगांवचे सरपंच श्री. संदीप डांगे हे होते. गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सद्गगती घाटावरील जुने कपडे, कचरा, पत्रावळी, दशक्रिया ठिकाणचे केस याची विल्हेवाट लावून स्वच्छता करण्यात आली. खऱ्या अर्थाने गाडगे बाबा यांना अभिप्रेत असलेले स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते श्री. दशरथ तुपे यांनी सूत्रसंचलनाद्वारे पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी ,डॉ.दत्ता कानडे,उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे सुधाकर वाघ, कृषी उद्योजक श्री. अनिलराव देसाई, सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,भाऊसाहेब बनकर,मोहन तांबे,विलास वाडेकर,संजय बाबर,बबलु फटांगरे,मनोज पिपाPडा,विष्णू गाडेकर,संजय वाघमारे,दीपक दंडवते,रवींद्र धस,शिवाजी पोटे,उमेश लुटे,रंगनाथ सदाफळ, ज्ञानेश्वर आरणे,प्रणव लावर,अर्जुन चव्हाण,सागर रोकडे,बाबासाहेब शेलार,सचिन लोढा,बापूसाहेब गायकवाड,सुधीर बोठे,केतन कुंभकर्ण,ऋषी गव्हाळे,रवी शिवरकर,विजय गाडेकर,विजय पठाडे,नवनाथ बनकर,विजय बनकर,विठ्ठल तांबे,विक्रम देसाई,सुनील घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ह्या गाडगे महाराजांच्या भजनाने समारोप करण्यात आला.
रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५
आदिवासी वीर एकलव्य जयंतीनिमित्त समाज मेळावा
आदिवासी वीर एकलव्य जयंतीनिमित्त समाज मेळावा
कोल्हार
आदिवासी वीर एकलव्य जयंतीनिमित्त आयोजित आदिवासी समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला. यावेळी एकलव्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अध्यक्ष राजू बर्डे यांच्यासह कोल्हार भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, माता-भगिनी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील यांनी या वेळी महत्त्वपूर्ण घोषणा करत, मतदारसंघातील एक दिवस समाजबांधवांसाठी देण्याचा निर्णय घेतला. समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी व्यक्तिशः उपलब्ध राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषतः वंचित घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
आदिवासी समाजाला यापुढे घरकुल, रेशन कार्ड यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागणार नाही, असे स्पष्ट करत, समस्यांचे निवेदन दिल्यास तत्काळ कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.
सत्कार न घेण्याचा निर्णय
जोपर्यंत आदिवासी समाजाच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही, असा स्पष्ट निर्णय डॉ.विखे यांनी घेतला. समाजहितासाठी महामानवांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन करत, समाजाला वंचित न राहू देता मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे ते म्हणाले.
समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार
कोल्हार भगवतीपुर येथून या चळवळीची सुरुवात करत आदिवासी समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन समस्या जाणून घेण्याचा संकल्प केला. समाजातील प्रश्न पूर्णतः सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून, समाजाच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाणार आहे. कोल्हार भगवतीपुर येथून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण समाजासाठी परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५
आत्मनिर्भरतेतून 'विकसित भारत' कडे नेणारा अर्थसंकल्पअर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार - ना.विखे पाटील
आत्मनिर्भरतेतून 'विकसित भारत' कडे नेणारा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार - ना.विखे पाटील*
अहिल्यानगर,
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने आणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत बाडणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. नागरिकांची बचत बाढून तेच देशविकासाचे भागीदार कसे बनतील, यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहीती देण्याकरीता ना.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले विनायक देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ सचिन पारखी आदि याप्रसंगी उपस्थित होते.
ना.विखे पाटील म्हणाले की, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. सामाजिक क्षेत्र, नहान मुले व गुषाशिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणात्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या बसंख्य संधी निर्माण करणारा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता बाद, रोजगारनिर्मिती, MSME क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि नाविन्यासाठी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या चार प्रमुख आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करप्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा वा सहा क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे.
ना.विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना, खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षांची विशेष मोहीम, मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ, फळ-भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकन्यांसाठी विशेष योजना, गुरिया आत्मनिर्भरता योजना यांसारख्या महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील.
याशिवाय, 'भारतीय भाषा पुस्तक योजना', पान नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स' ची स्थापना, सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी, पुढील पाच वर्षांत ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्स यांसारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक तरतुदींमुळे भारतातील विद्यार्थी जागतिक दर्जाच्या शिक्षणाने सक्षम होतील, असेही ते म्हणाले.
देशाच्या उज्वल भविष्यासाठी मध्यमवर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर TDS मर्यादा ₹ ५०,००० वरून ९१ लाख, घरभाड्यावर TDS मर्यादा १२.४० लाख वरून १६ लाख यांसारख्या महत्वाच्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.
सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शाश्वत आर्थिक विकास, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, MSME आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत, असेही यांनी सांगितले.
जन आरोग्य योजना, सक्षम आंगणवाडी व पोषण २.० कार्यक्रम, गिंग वर्कर्सचे कल्याण आणि जलजीवन मिशन गांसारख्या योजनांना अधिक बळ देत सामाजिक न्याय व जनकल्याणालाही सरकारने प्राधान्य दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या संदर्भात लवकरच रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असून पुणे नासिक रेल्वे मार्ग पुर्वी ठरलेल्या मार्गानेच होणार असल्याचे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
अप्पर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात विखे पाटील यांनी पुन्हा खुलासा करताना महसूल मंडळाची फेररचना झाल्या शिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे सांगतानाच तशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचे स्पष्ट केले.
साई निर्माण महाविद्यालय येथे व्याख्यान उत्साहात संपन्न..! शिवचरित्र वाचताना जीवन मूल्यांचे दालन समृद्ध बनते - प्रफुल्ल खपके
साई निर्माण महाविद्यालय येथे व्याख्यान उत्साहात संपन्न..!
शिवचरित्र वाचताना जीवन मूल्यांचे दालन समृद्ध बनते - प्रफुल्ल खपके
साई निर्माण एज्युकेशन हब चे साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल व साई निर्माण ज्युनियर कॉलेज, शिर्डी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भालेकर यांनी सांभाळले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान चापेकर सरांनी स्वीकारले, समवेत युवा व्याख्याते प्रफुल्ल खपके, ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष व पत्रकार तुषार महाजन, मुख्याध्यापक गणेश डांगे व संदीप डांगे, अरबाज पठाण, शुभम शेलार, विशाल बेलदार, अविनाश रोकडे आदि मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त अशाप्रकारे बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन हा विद्यार्थ्यांसाठी दर्शदायी, चारित्र्यसंपन्नता व जीवन मूल्यांचा पाठ घालून देणारा उपक्रम आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व मासाहेब जिजाऊ यांनी शिवबानां बालपणापासूनच मातृत्वाचे, आदर्शाचे, शूर-वीर पराक्रमाचे धडे दिले. चांगले चांगले सवंगडी सोबतीला दिले म्हणून पुढे हिंदवी स्वराज्य साकार झाले.
छत्रपती शिवरायांचे सूक्ष्म नियोजन, गनिमी कावा, युद्धतंत्र या सर्व असामान्य गुण कौशल्यांचा अभ्यास करून अनेक युरोपीय राष्ट्र आदर्श घेतात. यामध्ये अमेरिकेसारख्या महाबलाढ्य शक्तीला आपल्यासमोर नमवणारा व्हिएतनाम सारखा देश महाराजांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राचा आदर्श घेऊन लढला, छत्रसाल बुंदेला महाराजांचा आदर्श घेऊन बुंदेलखंड हे आपलं राज्य स्वातंत्र्य करून घेतो असे अनेक उदा. प्रफुल्ल खपके यांनी यावेळी दिली.
स्वराज्यामध्ये स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देव्हार्यामधील देवता समान, अर्थात पर स्त्री ही मातेसमान आहे अशी शिकवण होती. इथली रयत ही शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे सैन्याला दिलेले सक्त आदेश महाराजांचे शेतकरी धोरण दर्शवते. महाराजांना त्यावेळेस समजले होते सैन्य हे पोटावरती चालतं पोट भरलेली असली की पाठीचा कणा टाईट राहतो आणि कुठलीही असामान्य लढाई सहज लढता येते. असे स्वराज्याचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचे काम प्रफुल्ल खपके यांनी केली.
विद्यार्थ्यांना इतिहासातील ध्येयवाद, दूरदृष्टीकोण, सूक्ष्म अभ्यास-नियोजन, जिद्द-चिकाटी या गोष्टी भविष्याच्या वाटचालीसाठी गरजेच्या आहेत असे प्रतिपादन केले व यानंतर कार्यक्रमाचा समारोप होऊन आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५
श्रीरामपूर येथे जनसेवा फाऊंडेशनतर्फे भव्य हळदीकुंकू व “खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” कार्यक्रमाचे आयोजन
श्रीरामपूर येथे जनसेवा फाऊंडेशनतर्फे भव्य हळदीकुंकू व “खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” कार्यक्रमाचे आयोजन
श्रीरामपूर्
जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभ आणि “खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या, शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता थत्ते मैदान येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असून, तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष श्री. नितीन दिनकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे आणि इतर मान्यवरांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि रनरागीनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांची प्रमूख उपस्थिती असणार आहे
महिलांसाठी आकर्षक बक्षिसे
या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये *एक तोळा सोन्याचे नेकलेस*, सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही, सॅमसंग व व्हर्लपूल कंपनीचे फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, गॅस स्टोव्ह, सारेगामा कारवा यांसह 500 पैठणी साड्यांचा समावेश आहे.
या भव्य कार्यक्रमात तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक आणि मान्यवरांनी केले आहे.
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५
धनगरवाडीत शिवजयंती साजरी
धनगरवाडीत शिवजयंती साजरी
धनगरवाडी -
राहाता तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . ग्रामपंचायत कार्यालय धनगरवाडी येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ खरात यांनी केले. तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल परसराम रक्टे यांनी प्रतिमेचे पूजन व श्रीफळ अर्पण केले.या कार्यक्रमाला तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रामभाऊ रक्टे, उपसरपंच साहेबराव आदमाने, ग्रामपंचायतचे सदस्य महेश रक्टे, ग्रामपंचायत सदस्य गणेश राशिनकर, रामभाऊ आदमाने,पत्रकार बाबासाहेब मंडलिक नामदेव राशिनकर, योगेश रक्टे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश राशिनकर यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमापूजन केले.प्रसंगी दत्तात्रय बाळासाहेब राशिनकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भाषणे व गीतगायन सादरीकरण केले.
मुख्याध्यापक शरद होडगर, विजय जगताप,किशोर जगताप,अनिल धिरडे,गीता गलांडे,विवेक मोरे उपस्थित होते.
लोहगाव सोसायटीच्या कार्यालयात शिव जन्माचा सोहळा उत्साहात साजरा
लोहगाव सोसायटीच्या कार्यालयात शिव जन्माचा सोहळा उत्साहात साजरा
लोहगाव .
१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे.प्रा.किरण चेचरे.कृष्णा चेचरे.किशोर दंरंदले.अनिल चेचरे.अक्षय चेचरे.सोसायटीचे सचिव आर.व्हि.चेचरे. .गौरव राजेंद्र चेचरे, कुमार अशोक चेचरे,गणपत ज्ञानदेव शिंदे
आदी उपस्थित होते.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमध्ये सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन कोर्सच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमध्ये सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन कोर्सच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू
अहमदनगर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुरस्कृत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन या कोर्सच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, विळदघाट एमआयडीसी, अहिल्यानगर येथे सुरू झाले आहे. गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या बॅचमध्ये 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी यांनी दिली.
540 तासांच्या कालावधीच्या या प्रशिक्षणक्रमात विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये, व्यावसायिक ज्ञान व रोजगारक्षमतेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रकल्प कार्य व विविध अभ्यासेतर उपक्रमांचा समावेश आहे.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे महत्त्वाचे घटक:
• सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षण: अग्निशामक यंत्राचा वापर, कृत्रिम श्वास आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे.
• सौर ऊर्जेचे तांत्रिक ज्ञान: नैसर्गिक ग्रहांची हालचाल, सूर्यप्रकाशाचा मार्ग, किरणोस्तराची तीव्रता मोजणे, सौर नकाशा तयार करणे.
• इंस्टॉलेशन प्रक्रिया: साइट तपासणी, लेआउट समजून घेणे, पॅनेल माउंटिंग, खबरदारीचे उपाय व सिस्टमचे प्रभावी कार्य सुनिश्चित करणे.
हा प्रशिक्षणक्रम केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला असून विद्यार्थ्यांना नोकरी आणि उद्योजकतेसाठी सक्षम करण्याचा उद्देश आहे. सौर ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्रोत असल्याने पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी आणि ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौर पॅनल तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५
सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू – डॉ. सुजय विखे पाटील
सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू – डॉ. सुजय विखे पाटील
शिर्डी :
शिर्डीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. शिर्डीतील माता-भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासनाच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात केले.
यावेळी छत्रपती शासनाच्या वतीने घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना सात लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शिर्डीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ३०० कुटुंबांना घरगुती आवश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. विखे पाटील परिवाराच्या वतीनेही तिन्ही कुटुंबांना सात लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिर्डीत शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी यावेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांनी एकमुखाने अनिष्ट प्रवृत्तींचा विरोध करण्याचा आणि समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी एकोप्याने राहण्याचा निर्धार केला. याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
शिर्डीच्या विकासासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी बस स्थानकाच्या समोर “शिवसृष्टी” उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच शिर्डी सुरक्षित राहावी आणि चुकीची कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
साईबाबा संस्थानच्या टोकन प्रणालीबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी यामुळे मंदिर परिसरात दररोज १०,००० लोकांची गर्दी कमी झाल्याचे सांगितले. मात्र, हे १०,००० लोक कोण होते? याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. कोणीही अन्यायग्रस्त झाल्यास विखे पाटील परिवार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील. समाजहितासाठी सत्य बोलायचे असेल, तर त्यासाठी कोणताही विरोध पत्करण्यास आम्ही तयार आहोत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शिर्डीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंती दिनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंती दिनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले
लोणी -
स्वराज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचे राज्य स्थापन करणे हीच छ्त्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. त्यांच्याच विचारांचा जागर करून राज्यात महायुती सरकार काम करीत असून, योजनांच्या निर्णयात शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंती दिनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.प्रवरानगर येथे व्यापारी मित्र मंडळ आणि लोणी खुर्द आणि बुद्रुक येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून मंत्री विखे यांनी महाआरती केली.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनी विखे पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
लोणी येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य अखंड हिंदूस्थानच बलस्थान आहे.त्याग आणि संघर्षातून मिळालेले स्वराज्य टिकवून ठेवणे आपल्या सर्वाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
महराजांच्या इतिहासाची पारायण घराघरात झाली पाहीजे.कारण हा इतिहास आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा आहे.अनेक गड किल्ले महाराजांनी जिंकले.पण या गडांचा अभ्यास आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य सुध्दा खूप महत्वाचे असल्याचे विखे पाटील म्हणाले.
रयतेच्या राज्याची संकल्पना शिवाजी महाराजांनी कृतीत उतरवली.आज त्याच विचाराने राज्यातील महायुती सरकार लोकांसाठी काम करीत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
लोणी खुर्द येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले.डॉ विखे पाटील कारखान्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व संस्थामध्ये विद्यार्थी विद्यार्थीनीनी शिवजयंती सोहळ्याचे उत्साहाने आयोजन केले होते.लोणी आणि पंचक्रोशीतील सर्व रस्ते भगव्या झेड्यानी सजवले होते.युवक महीलांनी भगव्यामय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
संस्कार असेल तर संस्कृती टिकेल.- अनिलकाका गाढवे
संस्कार असेल तर संस्कृती टिकेल.- अनिलकाका गाढवे
गणेशनगर -
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी अध्यक्षपदावरून गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील यांनी छत्रपती शिवरायांचे कार्य सांगताना असे सांगितले की आज समाजामध्ये संस्काराची फार गरज आहे संस्कार असतील तर संस्कृती टिकेल देश बलवान होईल.हे सांगताना महाराजांचे विचार आचरणात आणायचे असतील तर प्रत्यक्षात भारतातील प्रत्येक नागरिकाने छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. त्यांच्या विचारावर निष्ठा ठेवून कृती केली पाहिजे, समाजातील माता भगिनींना आदरपूर्वक सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.या जयंतीनिमित्त हेच खरे अभिवादन शिवरायांसाठी असेल . या वेळी विद्यार्थी भाषणामध्ये गौरी घोगळ, प्रणाली पवार,आरोही बोधक, श्रेया कासार, तेजल शेलार, आराध्य गाढवे, अभिषेक बिरदोडे , श्रुती बोर्डे ,भावना गाढवे ,गोरे कोमल, तेजस्विनी आदिक या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर भाषणे केली इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यिनींनी शिवरायांच्या जीवनावर गीत गायन केले. शिक्षक मनोगतमध्ये श्री धनवडे सर यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्माचा प्रसंग सांगून राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांवरती बालपणापासून जे संस्कार केले तेच संस्कार त्यांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी प्रेरणादायी ठरले.म्हणून आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखी पुत्र असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे.हे सांगतांना महाराजांच्या कर्तबगारीचा लेखा जोखा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी शिवरायांच्या जीवनातील युद्धचातुर्य कौशल्याची माहिती मुलांना सांगितली. आदर्श राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हे सांगताना जी व्यक्ती प्रसंगी दोन पाऊल मागे येते ती चार पाऊल जास्त प्रगती करू शकते. आणि याच जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे समजावून सांगितले. घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलावरती राजमाता जिजाऊ सारखे संस्कार केले पाहिजेत तरच घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतील व स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर होईल.
या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलकाका गाढवे पाटील, विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री वसावे के के सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे पाटील, वाल्मीकभाऊ गाढवे पाटील ,सामाजिक कार्यकर्ते कारभारी पाटील घोगळ ,विनायकभाऊ देठे , पर्यवेक्षक तनपुरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रणाली पवार व गौरी घोगळ या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती उंडे मॅडम यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५" चा राष्ट्रीय पुरस्कार
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५" चा राष्ट्रीय पुरस्कार
अहिल्यानगर - फिजिओथेरपी अर्थात भौतिकोपचार तज्ञ यांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी (आयएपी) तर्फे दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक येथे दोन दिवसीय फिजिओथेरपिस्ट तज्ञांच्या ६२ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच "सर्वोत्कृष्ट प्राचार्य" म्हणून डॉ. श्याम गणवीर यांना सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार आयएपीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अली इराणी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. संजीव झा, खजिनदार डॉ. रुची वार्ष्णेय, आ. सत्यजीत तांबे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संचालक (वैद्यकीय) प्रा. डॉ. अभिजीत दिवटे व प्राचार्य डॉ. श्याम गणवीर यांनी स्वीकारला.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे भौतिकोपचार महाविद्यालय हे सन २००७ पासून सुरू असून राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यापन परिषद (NAAC) द्वारे 'A Grade' मानांकित आहे. तसेच तज्ञ शिक्षकवृंद यांचेमार्फत प्रतिभावान, कार्यक्षम आणि अष्टपैलू भौतिकोपचारतज्ञ घडविण्याचे अविरत कार्य सदरील महाविद्यालय करीत आहे. या महाविद्यालयामध्ये ६० क्षमतेने पदवी (UG) व ०५ विषयांत पदव्युत्तर (PG) तसेच २४ विद्यार्थी विद्यावाचस्पती (Ph.D.) अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.
भारतात भौतिकोपचार तज्ञांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढविणे गरजेचे असून अनेक व्याधींमुळे रूग्णांना हालचाल करणे व खेळाडूंसाठी देखील फिजिओथेरपीचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले.
१९५५ साली स्थापन झालेल्या इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी या संस्थेच्या सदस्यांनी समाजाला व देशाला सशक्त व सुदृढ ठेवण्यासाठी केलेले कार्य गौरवास्पद असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
सदरील पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय विखे पाटील तसेच महासंचालक (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड यांनी भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता मिळाल्याने शिव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता मिळाल्याने शिव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
श्रीरामपूर -
शहरात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या आराखड्यास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाने तसेच पुतळ्याच्या प्लेमॉडेललाही कला संचलनालयाची मान्यता मिळाल्याने स्मारकाच्या कामातील मार्ग निर्वेध झाला आहे.
शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची होती.यासाठी हिंदूत्ववादी संघटनांची आंदोलनही झाली.यासर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर व तालुका भाजपा पदाधिकारी यानी नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कड़े पत्र व्यवहार करुन स्माराकाच्या कामाचा पाठपुरावा केला होता. ना विखे पाटील यांनी तात्काळ दखल घेताली व निधी उपलब्घता करुन देतानाच जागेची निश्चिती केली. स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर आवश्यक असलेल्या मान्यता मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेस प्राप्त झाल्याने, स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दुर झाले आहेत.
स्मारकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाची परवानगी आवश्यक होती. यासाठी मंत्री विखे पाटील यांनी पाठपुरावा करुन, ही मान्यता तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न केले. या विभागाने स्मारकाच्या चबुत-याच्या आराखड्यास मान्यता दिल्याचे पत्रही नगरपालिका प्रशासनास मुख्य वास्तु शास्त्रज्ञ चेतन आक्रे यांनी पाठविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याची मान्यताही शासनाच्या कला संचलनालयाने दिली आहे. आश्वारुढ पुतळ्याच्या शिल्पकारास दिलेल्या सुचने प्रमाणे फायबरच्या तयार केलेल्या मॉडेलमध्ये सुधारणा करुन, त्याचे रुपांतर ब्रॉंझ धातू मध्ये करण्यासाठी संचलनालयाने मान्यता दिल्याचे कळविल्याने शहरातील आश्वारुढ पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरच आश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता मिळाल्याने शिव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मारकाचे काम लवकरच सुरु होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. स्मारकाच्या कामासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्या बद्दल महायुतीच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन आभार मानले आहेत.
भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर तालुका अध्यक्ष दीपक पटारे तसेच सर्व हिंदूत्ववादी संघटनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५
रामपूरवाडी मध्ये इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
रामपूरवाडी मध्ये इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय रामपूरवाडी मध्ये इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहाता तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश बी.शिंदे साहेब तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री शेषराव अनारसे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मिलिंद खंडीझोड सर हे होते.
सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री.योगेश शिंदे साहेब यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले, बालपणीच्या आठवणी सांगितल्या, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा व वापर केल्यास अभ्यासासाठीच करावा, व विद्यार्थ्यांनी क्षणिक सुखासाठी वाईट मार्गाने जाऊ नये चांगला अभ्यास करावा आई-वडिलांची नावे रोषन करावी, विद्यार्थ्यांना भावी वाटचालीच्या अनुषंगाने मुली / स्री यांचे बाबतीत गुन्हे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.तांबे एम.एस यांनी प्रस्ताविक मध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास कलर केल्यामुळे विद्यार्थ्यांचे, त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या त्यांच्या पालकांचे,ग्रामस्थांचे आभार मानले.
पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील, सरस्वती यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामस्थ,विद्यार्थी व शिक्षक भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच रामदास रणछोड यांनी भूषविले.
सदर कार्यक्रमासाठी श्री.शिवाजी जगताप, चांगदेव जाधव, बाळासाहेब जगताप (पोलीस पाटील),किरण म्हसे, रामकृष्ण सांबरे, राजेंद्र जगताप, बाबासाहेब ढोकणे, रोहन काळे, रावसाहेब सांबरे, गायके, जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी इयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यांनी अल्पोपहार दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिंदे एस आर. यांनी केले तर विद्यालयाचे शिक्षक श्री राहणे एस.जी,श्री काळे बी.एच, श्री मते पी. के, श्री शिंदे पी.के, श्री थोरात एस.एम, श्री कोळगे एस.ए, सौ.शेलार ए.ए, श्रीम.जाधव एम.एम,श्री.विनायक साबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.लहामगे एस.टी. सर यांनी मानले.
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५
श्री गणेश विद्यालयाचे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश
श्री गणेश विद्यालयाचे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेचे शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेमध्ये शेख साहिल, पवार प्रणाली , वायदंडे मयुरी , माघाडे सोहम , गायकवाड गौरव , पवार आयुष्य ,पाचरणे कोमल , सातूरे स्नेहल , हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले .तसेच गांधी विचार संस्कार आयोजित परीक्षेमध्ये अंजली लक्ष्मण भवर या विद्यार्थिनीने गोल्ड मेडल मिळवले, गौरी किरण घोगळ ,कासार अंजली ज्ञानेश्वर या विद्यार्थिनींनी सिल्वर मेडल मिळवले. जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये क्षीरसागर साई या विद्यार्थ्याने विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनामध्ये नेतृत्व केले, क्रीडा विभागामध्ये रेहान शेख या विद्यार्थ्याची सतरा वर्ष वयोगटांमध्ये राज्यस्तरावरती कबड्डी संघामध्ये निवड झाली, आग्रे समाधान याने एन सी सी कॅम्प शिबीरामधे रायफल खोल जोड या प्रकारात जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल मिळवले,
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्रीमती वराडे व्ही आर, सौ पिलगर एम एम, श्री वसावे व्ही आर,श्रीमती शहारे के एस, श्री धनवडे एस आर, श्री भोये कैलास यांचें मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर ,पर्यवेक्षक तनपुरे बी एफ, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे दादासाहेब गाढवे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ गाढवे , जयाभाऊ कालेशेठ,वाल्मीक गाढवे, विजयभाऊ सदाफळ, राजेंद्र जाधव,किरण राऊत व सर्व पालकांनी अभिनंदन केले.
धनगरवाडीत ठेंगबाबा यात्रा
धनगरवाडीत ठेंगबाबा यात्रा
धनगरवाडी
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सालाबाद प्रमाणे सोमवार दिनांक 17/2/2025 रोजी ठेंगबाबा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा ते आठ गंगेच्या पाण्याने अभिषेक करून यात्रेला प्रारंभ होईल.
अभिषेक करून संध्याकाळी चार ते सहा ठेंगबाबांच्या पालखीची व काठीची गावातून मिरवणूक होईल. सहा ते आठ डफाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल .ठेंगबाबा देव असा आहे की गाय ,शेळी ,मेंढी , यांना जर अचानक काही झाले तर भस्म लावल्यास गुण येतो .
लहान बाळाला देखील गुण येतो. हा देव नवसाला पावणारा आहे.यात्रेच्या दिवशी भाविक भक्त गुळाची शरणी वाटतात. यात्रेच्या दिवशी व्यवसायिकांचे विविध प्रकारची खेळणी, मिठाई आणि प्रसाद असे दुकान असतात.
अशी माहिती ठेंग बाबाचे सेवक ज्ञानेश्वर बाबा ठेंग , यात्रा कमिटीचे पंच व अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी दिली आहे .यात्रेच्या दिवशी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५
राहाता शहरात रस्त्यावर कुठेही वाहन लावताल तर होणार दंड-वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे- पो.नि. चव्हाण
राहाता शहरात रस्त्यावर कुठेही वाहन लावताल तर होणार दंड-
वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे- पो.नि. चव्हाण
राहाता
:
राहाता शहरात वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे, अस्तव्यस्त गाडी लावणारे, फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांना दंड राहाता पोलिस विभागाच्या वतीने पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री पेटारे यांनी शहरातील चौकात वाहन चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये विना क्रमांक, विना कागदपत्रे एकूण ३८ वाहने ताब्यात घेतली. विनापरवाना यासह नियम मोडणाऱ्यांकडून वाहन चालकांकडून २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी सांय ४ ते ७:०० वाजेपर्यत पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. पेटारे, हेड कॉन्स्टेबल श्री. गंभीरे, श्री अनारसे, पोलिस कॉन्स्टेबल श्री.गवांदे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह होमगार्डचे जवान यांच्या साथीने शहरातील .. चौकात वाहन चालकांसाठी ही मोहीम राबवली.यापैकी ४१ वाहनांच्या कागदपत्रांची शहानिशा आणि खात्री करून सोडण्यात आली,तर उर्वरित वाहनांच्या कागदपत्रांची शहानिशा पूर्ण होईपर्यंत ही वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.अचानक सुरू केलेल्या नाकाबंदी मोहिमेमुळे अनेक वाहनचालकांनी आपला मोर्चा इतर मार्गाने वळविला. मात्र, या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले. शहरात अल्पवयीन मुले दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविताना निदर्शनास येतात. त्यावरही कारवाईची मागणी होत आहे.
पोलिसांनी शहरातील वाहन तपासणी मोहिमेदरम्यान वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगण्याचेही पोलिसांनी यावेळी चालकांना आवाहन केले. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्म पाटील, शिर्डी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांचा मागदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
शाळा - विद्यालयीन परिसरात अनेक तरुण विनाकारण शाळा भरताना व सुटताना भरथाव वेगाने दुचाकी चालवतात.विद्यार्थिनींच्या पुढे - मागे वाहन चालविणे, काही ठिकाणी वाहने आडवी लावून जमावाने उभे राहणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे. मोठ्या आवाजातील सायलेंसर लावणे असे प्रकार घडत आहेत. याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी शिक्षक, पालक आणि सामजिक कार्यकर्ते कडून होत आहे
मुळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी 17 फेब्रुवारी ला आवर्तन सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील
अहील्यानगर
मुळा लाभक्षेत्रातील शेतकर्याची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी १७फेब्रुवारी २०२५ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभगाच्या अधिकार्याना दिल्या आहेत.
यापुर्वी मुळा उजवा कालव्याचे रब्बी आवर्तन ठरलेल्या नियोजना प्रमाणे पूर्ण झाले आहे.उन्हाळी आवर्तन १ मार्च पासून करण्याचे नियोजन होते.परंतू लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती.
यासंदर्भात आ.मोनिका राजळे आणि आ.विठ्ठलराव लंघे यांनीही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.
मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभिर्य लक्षात घेवून १७ फेब्रुवारी २० २५ पासूनच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने लाभक्षेत्रातील लोकांना मोठा दिलसा मिळणार आहे.
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षमता वाढीसाठी सर्व्हेक्षण करा-ना.विखे पाटील
उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षमता वाढीसाठी सर्व्हेक्षण करा-ना.विखे पाटील*
लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत
लोणी
गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या उपसा सिंचन योजना अधिक कार्यक्षमतेने सुरू राहाव्यात यासाठी या योजनांचे पुन्हा सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. या योजनांच्या कार्यक्षमता वाढीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्या.
गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ कडील विविध विषयाबाबत सन्माननीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेवून विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिल्या.
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, सन्माननीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघात मागणी केलेली कामे ही लोकहिताची असतात. या कामांच्या मंजुरीमुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा व जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याने ही कामे कालबध्द रीतीने पूर्ण झाली पाहिजेत. ज्या योजनांच्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे त्याचा प्रस्ताव सादर करावा. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे, दुरुस्ती करणे या कामात तज्ञांचे मत घ्यावे. पूर संरक्षक भिंत बांधणे बाबत सर्व्हे करावा.
राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने अनेक योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांची कामे गतीने व दर्जेदार व्हावीत. ही कामे जलद गतीने होण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. योजनांसाठी आवश्यक भूसंपादन कालमर्यादेत होणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
बैठकीस अपर मुख्य सचिव दिपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. अतुल कपोले, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संतोष तिरामणवार, जलसंपदा सह सचिव संजीव टाटू, अभय पाठक, उपसचिव प्रवीण कोल्हे यांच्यासह कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००००
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार प्रा. हनुमंत माने यांना प्रदान...
राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार
प्रा. हनुमंत माने यांना प्रदान...
राहाता...
येथील रयत शिक्षण संस्थेचे
शारदा विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज चे मराठी विषयाचे प्रभावी प्राध्यापक व प्रेरणादायी प्रशिक्षक
प्रा. हनुमंत माने यांनी संपादित केलेला " काव्यसंकल्प " राज्यस्तरीय प्रातिनिधीक कवितासंग्रहास "शब्दगंध" साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने
" राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार " संमेलनाध्यक्ष
डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर, आमदार संग्राम जगताप, पद्मश्री पोपटराव पवार ,प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर, प्रा. डॉ. संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
"काव्यसंकल्प" या कवितासंग्रहात संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक बारा कवींच्या प्रत्येकी आठ कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
हा कवितासंग्रह आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे.
"काव्यसंकल्प" हा प्रातिनिधिक कवितासंग्रह "लोक माझे सांगाती" या राजकीय आत्मकथनाचे लेखक माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाला सस्नेह अर्पण केलेला आहे.
या कवितासंग्रहाला
प्रा. डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.
प्रा. हनुमंत माने यांना
राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
प्रा. हनुमंत माने यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन- श्री. चंद्रकांत दळवी, सचिव- श्री. विकास देशमुख, संघटक- डॉ. अनिल पाटील सहसचिव- श्री. बी. एन. पवार ,
शाळा व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष- श्री. रमेशभाऊ शिंदे पाटील,प्राचार्य श्री. विवेक गाडेकर सर, प्रा. शरद गमे, प्रा. रमेश आहेर, प्रा. रणजीत पाटील,
डॉ. आसिर पठाण, प्रा. प्रसाद खोत, प्रा. मोहसीन शेख यांनी अभिनंदन केले आहे.
शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५
श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी अनिल डांगे यांचा प्रामाणिकपणा
श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी अनिल डांगे यांचा प्रामाणिकपणा
शिर्डी
शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी अनिल डांगे पादत्राणे विभागात काम करीत असताना त्यांना एका भक्ताचे पाकीट सापडले त्या पाकीट मध्ये 6330 रुपये होते त्यांनी सदर पाकीट संरक्षण विभागात जमा केले त्यांच्या प्रामाणिकपणामुळे पीएसआय रोहिदास माळी यांनी सत्कार केला सदर पाकीट साईभक्त हिना राजेश चौधरी रा सुरत (गुजरात) यांचे असल्याची खात्री झाल्याने त्यांना परत केले त्यांच्या प्रामाणिकपणे मुळे साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार संचालक मंडळ संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी यांनी अभिनंदन केले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
Featured post
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील दाढ बुद्रुक आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...
-
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील ॲड ऋषिकेश किसन आभाळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( JMFC) पदी नियुक्ती राहाता तालु...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण होवुन राहाता शिर्डी शहरातुन जाणा-या रस्त्यावर उड्डाणप...


















