गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

लोहगाव सोसायटीच्या कार्यालयात शिव जन्माचा सोहळा उत्साहात साजरा

लोहगाव सोसायटीच्या कार्यालयात शिव जन्माचा सोहळा उत्साहात साजरा


 


लोहगाव . 
                   १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५  जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी  सोसायटीचे  चेअरमन  राजेंद्र  चेचरे   म्हणाले की  छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे सांगितले.
                  याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे.प्रा.किरण चेचरे.कृष्णा चेचरे.किशोर दंरंदले.अनिल चेचरे.अक्षय चेचरे.सोसायटीचे सचिव आर.व्हि.चेचरे. .गौरव राजेंद्र चेचरे, कुमार अशोक चेचरे,गणपत ज्ञानदेव शिंदे

आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...