सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

स्वच्छता हीच परमेश्वराची सेवा : खंडेराव कडलग

स्वच्छता हीच परमेश्वराची सेवा :  खंडेराव कडलग 

राहता
                 राष्ट्रसंत गाडगेबाबा हे खरे राष्ट्रहित जपणारे आधुनिक संत होते. स्वतः अडाणी असून ही शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही. हे ओळखून  त्यांना मिळालेली जमीन त्यांनी रयत शिक्षण संस्थेस शालेय उपयोगासाठी दिली. समाजातील अंधश्रद्धा गाडण्यासाठी त्यांनी त्या काळात सुख दुःखाप्रसंगी पाहुणे रावळे यांना दिली जात असलेले मटणाचे जेवण व दारू ही अनिष्ट प्रथा  स्वतः पासून  बंद करून  त्याऐवजी गोड जेवण दिले. सावकाराचे कर्ज घेऊन समारंभ करू नये म्हणून  प्रबोधन केले. आणि स्वच्छता हीच परमेश्वराची सेवा आहे असे दररोज कीर्तनात सांगून त्या गावची सेवा प्रथम स्वच्छतेने व नंतर प्रबोधनाने करत असे उदगार महाराष्ट्र राज्य परीट/ धोबी समाजाचे होणारे नूतन प्रदेशाध्यक्ष श्री खंडेराव कडलग यांनी काढले.
                  राहाता येथील साईयोग मंडळ, राहाता ग्रामस्थ, दहीगांव ग्रामस्थ, राहाता तालुका परीट धोबी सेवा मंडळ ,  लायन्स क्लब राहाता सह्याद्री व पुणे येथील संस्कार प्रतिष्ठान कार्यकर्ते मार्फत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे 149 व्या जयंतीप्रसंगी आयोजित केलेल्या सद्गगती घाट  स्वच्छता मोहीमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांनी केले. ॲड. दत्तात्रय धनवटे, यांनी आपले विचार मांडले.  या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर परीट धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री. खंडेराव कडलग, साईयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राहाता नगरपालिकेचे. स्वच्छता अँबेसेडर डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे संस्थापक ला. विनोद गाडेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. नितीनभाऊ कापसे तर दहीगांवचे सरपंच श्री.  संदीप डांगे  हे होते.  गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून त्यांनी आपले मनोगत  व्यक्त केले. 
       

       सद्गगती घाटावरील जुने कपडे, कचरा, पत्रावळी, दशक्रिया ठिकाणचे केस याची विल्हेवाट लावून स्वच्छता करण्यात आली. खऱ्या अर्थाने गाडगे बाबा यांना अभिप्रेत असलेले स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 
                सामाजिक कार्यकर्ते श्री. दशरथ तुपे यांनी सूत्रसंचलनाद्वारे पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी ,डॉ.दत्ता कानडे,उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे सुधाकर वाघ, कृषी उद्योजक श्री. अनिलराव देसाई, सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,भाऊसाहेब बनकर,मोहन तांबे,विलास वाडेकर,संजय बाबर,बबलु फटांगरे,मनोज पिपाPडा,विष्णू गाडेकर,संजय वाघमारे,दीपक दंडवते,रवींद्र धस,शिवाजी पोटे,उमेश लुटे,रंगनाथ सदाफळ, ज्ञानेश्वर आरणे,प्रणव लावर,अर्जुन चव्हाण,सागर रोकडे,बाबासाहेब शेलार,सचिन लोढा,बापूसाहेब गायकवाड,सुधीर बोठे,केतन कुंभकर्ण,ऋषी गव्हाळे,रवी शिवरकर,विजय गाडेकर,विजय पठाडे,नवनाथ बनकर,विजय बनकर,विठ्ठल तांबे,विक्रम देसाई,सुनील घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ह्या गाडगे महाराजांच्या भजनाने समारोप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...