शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५

श्री गणेश विद्यालयाचे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश

श्री गणेश विद्यालयाचे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश



रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेचे शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेमध्ये शेख साहिल,  पवार प्रणाली , वायदंडे मयुरी , माघाडे सोहम , गायकवाड गौरव , पवार आयुष्य ,पाचरणे कोमल , सातूरे स्नेहल , हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले .तसेच गांधी विचार संस्कार आयोजित परीक्षेमध्ये अंजली लक्ष्मण भवर या विद्यार्थिनीने गोल्ड मेडल मिळवले, गौरी किरण घोगळ ,कासार अंजली ज्ञानेश्वर या विद्यार्थिनींनी सिल्वर मेडल मिळवले. जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये क्षीरसागर साई या विद्यार्थ्याने विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनामध्ये नेतृत्व केले, क्रीडा विभागामध्ये रेहान शेख या विद्यार्थ्याची सतरा वर्ष वयोगटांमध्ये राज्यस्तरावरती कबड्डी संघामध्ये निवड झाली, आग्रे समाधान याने एन सी सी कॅम्प शिबीरामधे रायफल खोल जोड या प्रकारात जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल मिळवले,
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्रीमती वराडे व्ही आर, सौ पिलगर एम एम, श्री वसावे व्ही आर,श्रीमती शहारे के एस, श्री धनवडे एस आर, श्री भोये कैलास यांचें मार्गदर्शन लाभले. 



यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर ,पर्यवेक्षक तनपुरे बी एफ, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे  दादासाहेब गाढवे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा  गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ गाढवे , जयाभाऊ कालेशेठ,वाल्मीक गाढवे, विजयभाऊ सदाफळ, राजेंद्र जाधव,किरण राऊत व सर्व पालकांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...