गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

महात्मा गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

 महात्मा गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात





लोहगाव (वार्ताहार):
प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयातील १९६८ सालच्या जुनी अकरावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयात हुतात्मा दिनाच्या निमित्ताने नुकताच उत्साहात संपन्न झाला. 
प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयातील १९६८ सालच्या जुनी अकरावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयात हुतात्मा दिनाच्या निमित्ताने नुकताच उत्साहात संपन्न झाला. 
१९६८ साली जुनी अकरावी या वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यातील प्रमुख अतिथींच्या हस्ते हुतात्मा दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य संजय ठाकरे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शेतकरी नेते उत्तमराव आहेर, माजी चेअरमन तुकाराम बेंद्रे, प्रभाकर निर्मळ, बापूसाहेब बेंद्रे, संपतराव खर्डे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा स्नेहवस्त्र आणि गुलाब पुष्प देऊन प्राचार्य संजय ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधिकरित्या संजय ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयासाठी दोन टीव्ही संच भेट देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य संजय ठाकरे व उपप्राचार्य अलका आहेर यांनी या भेट वस्तूंचा स्वीकार केला. यावेळी या विद्यार्थ्यांचे शिक्षक आर.डी. चौधरी,  डॉ. अनंत देवधर, तुकाराम बेंद्रे, बापूसाहेब बेंद्रे, प्रभाकर निर्मळ, चंद्रकांत भोंगाळे यांनी आपल्या मनोगतातून तत्कालीन आठवणींना उजाळा देत कर्मवीरांचे आणि रयत शिक्षण संस्थेचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच शाखेच्या संस्कारातून जीवन घडल्या बद्दलची धन्यता व्यक्त केली. यावेळी प्रकाश परब, पुणे आणि कचरू विखे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये खाऊसाठी दिले. 
या स्नेहमेळाव्याचे संयोजन बापूसाहेब बेंद्रे, विठ्ठलराव कडस्कर, बबन कडू, धोंडीराम कडू, भागवतराव कडू, लिलावती आहेर, शंकरराव हिवडकर, दत्तात्रय चौधरी आदींनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट आणि अश्विनी सोहोनी यांनी केले तर शेवटी कचरू विखे यांनी आभार मानले. या माजी विद्यार्थ्यांसाठी संपतराव खर्डे यांनी कोल्हार येथील संस्कार संपदामध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी भाऊसाहेब शेळके, भाऊसाहेब घोलप, विठ्ठल निबे, सुधाकर खोसे, अशोक सोनवणे, वेणूनाथ कडू, बाबासाहेब घोगरे, दगडू घोगरे, अरविंद धुमाळ, रावसाहेब कडू, साहेबराव कडू, जनार्दन कोरडे, धनंजय तांबवेकर, अशोक संचेती, सोपान अंत्रे, भागवत विखे, रामनाथ चौधरी, किसन विखे दगडू खर्डे, शिवाजी वाबळे, मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, रेणुका वर्पे, माधुरी वडघुले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह पुणे, नाशिक येथून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध गुणदर्शन सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला – गुणांना वाव – श्री. प्रमोद रोहमारे

 

विविध गुणदर्शन सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला – गुणांना वाव – श्री. प्रमोद रोहमारे




पोहेगाव :- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग.र.औताडे पा. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विविध गुणदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला . या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच आपल्यातील कला गुणांचा विकास करावा असे आवाहन वत्सल इंग्लिश मेडीअम स्कूल चे संचालक श्री प्रमोद रोहमारे यांनी अध्यक्षपदावरून केले.
दिनांक 29 जानेवारी रोजी विद्यालयात विविध गुणदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन व गणेशवंदनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण जन जागृती विषयक नाटिका , पखवाज , टाळ वादन , भावगीत गायन , देशभक्तीपर नृत्य असे विविध कलाविष्कार सादर केले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री. विशाल रोहमारे , श्री. नंदकिशोर औताडे , श्री. वाल्मिक नवले यासह श्री. गंगाधर गणपतराव औताडे , श्री. मार्तंड शिंदे ,श्री. गणेश वाकचौरे , श्री.अशोक औताडे , जय साईनाथ ग्रुपचे श्री. शरद फुलारे , आदिवासी संघटनेचे जयदीप भालेराव, किरण गांगुर्डे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बक्षिसांचा बाल कलाकारांवर वर्षाव केला. तसेच या प्रसंगी नानासाहेब दगडूजी पा. रोहमारे एजुकेशन सोसायटी संचलित वत्सल इंग्लिश मेडीअम स्कूल तर्फे  विद्यालयातील गरजवंत , हुशार विद्यार्थ्यांसाठी ११००० रु. देणगी वत्सल चे संचालक श्री प्रमोद रोहमारे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र काळंगे यांनी केले तर आभार श्री . कमलाकर शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.एस.के.शिंदे , पर्यवेक्षक श्री.सी.के.नेहे ,सांस्कृतिक मंडळ सदस्यश्रीमती स्वाती बागुल ,श्रीमती अलका लहामगे , श्रीमती वायाळ , श्री.राहुल आहिरे, श्री.अनिल गांगुर्डे , श्री.ज्ञानेश्वर राठोड , श्री.प्रदीप दरेकर , श्री.विजय भोसले , सौ.बैरागी ,सौ.शिंदे एम.डी. सौ.बनसोडे , सौ.धीवर ,श्री.विजय सूर्यवंशी , श्री.सुनिल भारमल , श्री.संजय इंगळे , श्री.सुनिल दवंगे यांचे सह सर्व शिक्षक ,शिक्षकेतर सेवक यांनी परीश्रम घेतले.  



पश्चिम घाट माथ्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य सरकारला नोटीस !

 पश्चिम घाट माथ्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य सरकारला नोटीस !



नगर विशेष प्रतिनिधी:- 


         गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे
असून याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे व रुपेंद्र काले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात गतवर्षी केलेल्या जनहित याचिकेची (क्रं.५/२०२४) नुकतीच सुनावणी संपन्न होऊन न्या.मंगेश पाटील व न्या.प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.त्यामुळे तुटीच्या गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
   सदरचे सविस्तर वृत्त असे की,"गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे.त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष गेल्या काही दशकापासून धुमसत आहे.पाण्याचा उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही.मात्र सरकार आणि नेते निवडणुका पाहून घोषणा करण्यापलीकडे काहीही कृती करत नसल्याचे बोलाचा भात,बोलाची कढी शिजवत असल्याचे वारंवार उघड झाले आहे.त्यामुळे हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार नानासाहेब जयराम जवरे व विक्रांत रुपेंद्र काले यांनी नुकतीच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपिठात आज एक जनहित याचिका (क्रं.०५/२०२४) दाखल केली होती.
या याचिकेतील माहितीनुसार,"उत्तर कोकणातील नार-पार,अंबिका औरंगा,दमणगंगा,वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात ३१७ टी.एम.सी.अतिरिक्त पाणी शिल्लक आहे.पश्चिम वाहिनी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी प्राथमिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने २००१ व २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार,दमणगंगा,वैतरणा,उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांद्वारे; तसेच उपसा नदीजोड,वळण योजनांद्वारे एकूण ८९.९२ टी.एम.सी.पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे.त्यानुसार जवळपास ७.४ टी.एम.सी.पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे; तर १५.५ टी.एम.सी.पाणी प्रमुख उपसा वळण योजनांद्वारे असे एकूण मिळून २२.९ टी.एम.सी. पाणी वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.यासाठी प्रवासी वळण योजनेद्वारे एकूण ३० योजना प्रस्तावित असून,यापैकी काही १४ योजना पूर्ण केल्या असल्याच्या घोषणा निवडणुका पाहून केल्या जात आहेत.त्याद्वारे १.३५ टीएमसी पाणी वळविले जाईल.११ भविष्यकालीन योजनांद्वारे ४.९८ टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित असल्याच्या घोषणा ऐकून शेतकऱ्यांना आता विट आला आहे.मुख्य म्हणजे प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे जवळपास १५.५५ टी.एम.सी.पाणी वळविण्याचे प्रस्तावित आहे.यात प्रवरा खोऱ्यातील घाटघर जवळील हिवरा नाला तसेच साम्रद गावाजवळील साम्रद नाला येथे वळण बंधारे बांधून पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वकडे वळविण्याची योजना आहे.या बंधाऱ्याद्वारे एकूण १२८७ द. ल.घ.फूट अतिरिक्त पाणी वळविणे शक्य होणार असून त्याचा निळवंडे प्रकल्पासाठी फायदा होणार आहे.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समिती व शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे.
तर कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.तसेच वैनगंगा-नळगंगा योजनेअंतर्गत ४८० किमीचा बोगदा तयार करून वैनगंगा नदीचे पाणी थेट पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणले जाणार आहे.यासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी त्या भागातली सर्व अपूर्ण सिंचन योजना पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्री आणि मंत्री करत आहे.मात्र नगर नाशिक जिल्ह्यातील कमी झालेले पाणी आणि उद्ध्वस्त केलेली शेती याबाबत कोणीही चकार शब्द काढत नाही हे विशेष ! मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत निळवंडे प्रकल्पा सारखेच कोणीही नेता अथवा प्रशासकीय अधिकारी स्पष्ट बोलत नाही.त्यामुळं यावर एक घाव दोन तुकडे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे आणि रुपेंद्र काले यांनी निर्णय घेतला होता.व त्या दृष्टीने कागदपत्र जमवणे अनेक वर्षांपासून सुरु ठेवले होते.त्याबाबत गतवर्षी तयारी पूर्ण झाली होती व त्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्याशी विचार विनिमय व एक बैठक छ.संभाजीनगर येथे संपन्न होऊन त्यावर नुकतीच निळवंडे (तथा ऊर्ध्व प्रकल्प-२) सारखी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या नुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजींनगर येथील कोर्ट क्रं.एकचे न्या.रवींद्र घुगे व न्या.वाय.जी.खोब्रागडे यांचे समोर हि जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.शिवाय शेतकरी संघटना आणि गोदावरी खोऱ्यातील शेतकरी यांनी कोपरगाव येथे एकत्र येत या पाण्यासाठी संघर्ष समिती स्थापन केली आहे.त्याची सुनावणी आगामी मंगळवार दि.२८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली असल्याची माहिती अड्.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
   दरम्यान यात उच्च न्यायालयाचे न्या.मंगेश पाटील व न्या.प्रफुल्ल कुबाळकर यांचे समोर ही सुनावणी पार पडली आहे.त्यात उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या गोदावरी खोरे मराठवाडा विकास महामंडळास ही नोटीस बजावली आहे.
त्यावेळी उर्ध्व गोदावरी खोरे जल पुनर्स्थापना संघर्ष नगर-नाशिक समितीच्या वतीने शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी जोरदार युक्तिवाद केला तर सरकारी पक्षाचे वतीने अभियोक्ता श्री सुरासे यांनी आपली बाजू मांडली त्यावेळी उच्च न्यायालयाचे न्या.मंगेश पाटील व न्या.प्रफुल्ल उबाळकर यांनी राज्य सरकारला ही नोटीस बजावली आहे.पुढील सुनावणी आगामी २०  फेब्रुवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयात संपन्न होणार असल्याची माहिती ऍड.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.



बुधवार, २९ जानेवारी, २०२५

आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीद वाक्य घेऊन तालुक्याचा विकास करणार खा.वाकचौरे

आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीद वाक्य घेऊन तालुक्याचा विकास करणार खा.वाकचौरे


पानेगांव (वार्ताहर)-
 आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीद वाक्य अमलात आणून नेवासे तालुक्याचा विकास करणार असा शब्द खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नेवासे तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी,ते एम. डी. आर खेडलेपरमानंद ५/६०० कि.मी (५.५४ कोटी) गेवराई ते भेंडा बु.ते नजिक चिंचोली ते दिघी रस्ता ६/८०० कि.मी
 (५.०५ कोटी) नारायणवाडी, निपाणी निमगांव, खरवंडी, हिंगोणी ते विठ्ठलवाडी रोड ३/५३० कि.मी (२.९८ कोटी)या रस्त्यांचा कामांचा शुभारंभ  बेल्हेकरवाडी (ता.नेवासे) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 
अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर हे होते.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आगमन होताच फटाक्यांचा आताषबाजीने तसेच घोषणेने जल्लोषात स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की,
खासदार वाकचौरे यांनी आठवण करून देताना सांगितले की, खासदार निधी काय असतो सुरुवातीला मी दाखवून दिले. शिर्डी मतदारसंघातील जवळपास सात तालुक्यात प्रत्येक गावात काम केले मी स्वतः प्रशासनातील सेवानिवृत्त अधिकारी तसेच येथील रहिवासी असल्याने मतदार संघातील अडिअडचणी वयक्तिक प्रश्न शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब,युवकांचे प्रश्नांनवर नेहमीच अग्रभागी ठेवून सोडविण्याचे काम केले. अशा पद्धतीने काम पुढे पुर्ण क्षमतेने सुरू राहणार असून तुमची खंबीर साथ हवी आहे.असं खासदार वाकचौरे यांनी सांगितले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जगदंबा देवी दर्शन घेऊन येथील ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांनी, खासदार वाकचौरे तसेच शिवसेनेचे (उबाठा)गटाचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.बेल्हेकरवाडी येथी घरकुल, शिवरस्ता, अंतर्गत रस्ते त्याचबरोबर विजेचा सिंगल फेज बाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून मार्गी लावला येथील ग्रामस्थांनी खासदार वाकचौरे यांचा जयजयकार केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, नेवासे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, नेवासे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब गोल्हार, ग्राहक सेनेचे मुकुंद सिनगर,किशोर सोनवणे,सारंग फोफसे, युवासेनेचे पंकज लांभाते, शेतकरी सेनेचे पंडित सोनवणे,डॉ एकनाथ जाधव, बाबासाहेब फोफसे, बेल्हेकरवाडी सरपंच गणेश पवार, उपसरपंच सुदाम बर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत बेल्हेकर, दत्तात्रय बेल्हेकर, कानिफनाथ येळवंडे,गणेश गडाख, आसाराम बेल्हेकर, सुरेश शिंदे,कुंडलिक बेल्हेकर, सुभाष कुरकुटे,संजय गडाख, संतोष शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग भाऊसाहेब गुंजाळ, उपअभियंता संजय गायकवाड, ग्रामविकास अधिकारी कृष्णा बडे, जयराम कदम, शशिकांत बेल्हेकर, कैलास शिंदे, सिताराम रोठे,भाऊसाहेब राजळे, सकाहारी राजळे आदींसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सुत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी केले आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने नऊ वे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या संपन्न*-

 साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने नऊ वे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या  संपन्न*- 


नेत्रसेवा हीच साईसेवा

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने  दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी  नऊ वे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.
यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री.डॉ प्रकाश पाटील व बंगलोर येथील डॉ. सौ. रेणुका व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
26 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास 960 रुग्णांची मोफत तपासणी होऊन चारशे तीस रूग्णांना मोफत चष्मा वाटप केले व 50 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी मुंबई येथे नेण्यात आले. शिर्डी शहर व परिसर तसेच ठाणे,कल्याण, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर ,येवला, संगमनेर, श्रीरामपूर, नाशिक,राहाता, कोपरगाव, नेवासा आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 7740 गरजू व वयोवृद्ध  रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत  665 पेशंट ची  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे  यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच  भारतात नावारूपास आले आहे. अशा  प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील. पुढील दहाव्या मोफत शिबीराचा लाभ देशातील अनेक  गरजूंनी घ्यावा असे आवाहन  ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील यांनी केले.  ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांच्या विशेष परिश्रमाने कार्यक्रम सुरळीत पार पडला.

राहता येथील साई दत्त मंदिराचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रविवार साई चरित्र ग्रंथावर आधारित संगीतमय प्रवचन

राहता येथील साई दत्त मंदिराचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रविवार साई चरित्र ग्रंथावर आधारित संगीतमय प्रवचन



  राहता येथे श्री साई दत्त मंदिर या मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन रविवार दिनांक २  २. २०२५ रोजी वेळ सायंकाळी ४ .ते  ७ या वेळेत साजरा होणार असून यावेळी श्री साई चरित्र ग्रंथावर आधारित संगीतमय प्रवचन सादर करते श्री साई खिचडी ग्रुप शिर्डी यांचे  प्रवचन होणार आहे या प्रवचन कार्यक्रमानंतर श्री साई ची आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्व राहाता ग्रामस्थ साई भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई मंदिराचे व दत्त मंदिराचे अध्यक्ष विश्वस्त साई भक्त यांनी केले आहे
कार्यक्रमाचे ठिकाण  श्री साई मंदिर श्री दत्त मंदिर जुनी गढी राहता येथे कार्यक्रम होणार आहे

.ग.र.औताडे पाटील विद्यालयात विविध गुण दर्शन सोहळा .

श्री .ग.र.औताडे पाटील विद्यालयात विविध गुण दर्शन सोहळा .

पोहेगाव :- 
 रयत शिक्षण संस्थेच्या  श्री ग.र.औताडे पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी बुधवार दिनांक २९/१/२०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता विविध गुण दर्शन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्यात विद्यालयातील विद्यार्थी गायन, वादन, नृत्य आविष्कार सादर करणार आहे . तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी नाटिका देखील सादर करणार आहे. विद्यार्थ्यांच्या या कला गुणांना दाद देण्यासाठी जास्तीत जास्त पालक, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के. शिंदे, पर्यवेक्षक श्री नेहे सी.केज्युनिअर विभागप्रमुख श्री. शिंदे के.बी. ,सांस्कृतिक विभाग समिती , सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, स्थानिक स्कूल सल्लागार समिती , शालेय व्यवस्थापन समिती यांनी केले आहे.

धनगरवाडी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

धनगरवाडी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


धनगरवाडी(वार्ताहर) 

राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय धनगरवाडी येथील ध्वजारोहण धनगरवाडीचे सरपंच गोपीनाथ खरात यांच्या हस्ते करण्यात आले.
      यानंतर सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित झाले.शाळेचे ध्वजारोहण धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र नामदेव रक्टे होते.कार्यक्रमासाठी सरपंच गोपीनाथ खरात, पोलीस पाटील विठ्ठलराव राशिनकर,ग्रामपंचायत सदस्य अशोकराव रक्टे, गणेश राशिनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र भोंडे,उपाध्यक्ष गणेश राशिनकर,माजी अध्यक्ष देवानंद लांडे,उपाध्यक्ष संजय राशिनकर,दत्तात्रय नामदेव रक्टे,दिगंबर रक्टे,अंबादास रक्टे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल परशराम रक्टे,उपाध्यक्ष रामभाऊ चांगदेव रक्टे, सोपान आदमाने,भाऊसाहेब साखरे,एकनाथ राशिनकर ,रमेश भोंडे,गोपीनाथ राशिनकर,डॉ.अशोक भोंडे,ग्रामसेविका सरला कहार मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.
  


  शाळेचे मुख्याध्यापक शरद होडगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.शाळेतील शिक्षक विजय जगताप यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी सायली बबन रक्टे व धनश्री गणेश राशिनकर यांनी केले.शाळेतील इयत्ता 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.प्रसंगी देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.प्रसंगी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बाबासाहेब मंडलिक यांचा कार्यगौरव करण्यात आला.शाळेने चालू शैक्षणिक वर्षात विविध गुणदर्शन स्पर्धा,क्रीडा स्पर्धा, इसरो सहल परीक्षा, हॅकेथॉन या स्पर्धेत मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल शिक्षक किशोर जगताप यांनी माहिती दिली.अनिल धिरडे सर यांनी आभार मानले.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका गीता गलांडे,विवेक मोरे,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आकाश राशिनकर, अंगणवाडीच्या मंदाबाई रक्टे, वैशालीताई आदमाने,इंदूबाई बागडे,कविताताई माळी,छबूबाई राशिनकर यांनी प्रयत्न केले.

ग.र.औताडे पाटील विद्यालयाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग भरारी .

 .ग.र.औताडे पाटील विद्यालयाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग भरारी .



पोहेगाव :-  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , संगमनेर जि . अहिल्यानगर . यांचे मार्फत STARS प्रकल्पांतर्गत Hackathon उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये श्री.ग.र. औताडे पाटील विद्यालयातील इ.७ वी तील गुरुकुलचा विद्यार्थी आयुष गणेश जाधव याने फायर फायटर रोबोट बनवून आपला जिल्हास्तरावर सहभाग नोंदविला होता.त्यात त्याला यश मिळवून जिल्हा प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवून गौरविण्यात आले . पुढे त्याला राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे . त्याला त्याचे वर्गशिक्षक श्रीम. बागुल एस.व्ही.यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .त्याचबरोबर विद्यालयाचे मा. मुख्या.श्री. शिंदे एस. के.आणि पर्यवेक्षक श्री.नेहे सी.के. , ज्युनिअर विभागप्रमुख श्री. शिंदे के.बी.यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.
त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे . त्याचे आणि त्याचे पालक श्री. गणेश जाधव यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला . विद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अध्यक्ष श्री आशुतोष काळे, विभागीय अधिकारी श्री एन.एस.बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री प्रमोद तोरणे, श्री. बाबासाहेब नायकवाडी तसेच पोहेगाव स्थानिक स्कूल सल्लागार समिती , शालेय व्यवस्थापन समिती , पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी  ग्रामस्थ यांनी या यशाबद्दल आयुष गणेश जाधव व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के.शिंदे, पर्यवेक्षक श्री नेहे सी.के. श्रीमती बागुल तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे भरभरून कौतुक केले व भावी  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

श्री ग.र पाटील विद्यालयाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग भरारी .

श्री ग.र पाटील विद्यालयाची   जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग भरारी .


पोहेगाव :-
  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , संगमनेर जि . अहिल्यानगर . यांचे मार्फत STARS प्रकल्पांतर्गत Hackathon उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये श्री.ग.र. औताडे पाटील विद्यालयातील इ.७ वी तील गुरुकुलचा विद्यार्थी आयुष गणेश जाधव याने फायर फायटर रोबोट बनवून आपला जिल्हास्तरावर सहभाग नोंदविला होता.त्यात त्याला यश मिळवून जिल्हा प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवून गौरविण्यात आले . पुढे त्याला राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे . त्याला त्याचे वर्गशिक्षक श्रीम. बागुल एस.व्ही.यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .त्याचबरोबर विद्यालयाचे मा. मुख्या.श्री. शिंदे एस. के.आणि पर्यवेक्षक श्री.नेहे सी.के. , ज्युनिअर विभागप्रमुख श्री. शिंदे के.बी.यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.
त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे . त्याचे आणि त्याचे पालक श्री. गणेश जाधव यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला . विद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अध्यक्ष श्री आशुतोष काळे, विभागीय अधिकारी श्री एन.एस.बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री प्रमोद तोरणे, श्री. बाबासाहेब नायकवाडी तसेच पोहेगाव स्थानिक स्कूल सल्लागार समिती , शालेय व्यवस्थापन समिती , पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी  ग्रामस्थ यांनी या यशाबद्दल आयुष गणेश जाधव व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के.शिंदे, पर्यवेक्षक श्री नेहे सी.के. श्रीमती बागुल तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे भरभरून कौतुक केले व भावी  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शनिवार, २५ जानेवारी, २०२५

विळदघाट येथे जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींसाठी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन

विळदघाट येथे जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींसाठी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन

नगर
सोमवार व मंगळवार, दि. २७ व २८ जानेवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींसाठी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आयोजन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, स्पेशल ओलंपिक भारत (अहिल्यानगर), जिल्हा क्रिडा विभाग आणि समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

ही स्पर्धा अभियांत्रिकी महाविद्यालय क्रिडांगण, इंग्लिश मीडियम स्कूल क्रिडांगण, आणि डॉ. विखे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अहिल्यानगर येथे सकाळी ठीक ९:०० वाजता सुरू होईल.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील, मा. धनश्रीताई विखे पाटील (अध्यक्षा, स्पेशल ओलंपिक भारत, अहिल्यानगर), जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि विखे पाटील फाउंडेशनचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय, २७ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ४:०० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

भिकाजी नळे यांचे निधन


लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील अस्तगांव येथील भिमाजी गोपाळा नळे( वय ९५) यांचे नुकतेच निधन झाले. ते गणेश सहकारी साखर माजी कामगार . ग्रामपंचायतचे माजी सदस्य म्हणून त्यांनी  पंधरा वर्षे कामकाज पाहिले. स्थानिक स्कूल कमिटीचे सल्लागार होते   . त्यांच्या पश्चात एक मुलगा. सून. तीन नातू. असा परिवार आहे. शिवसेना (ठाकरे)गटाचे अस्तगांव शाखाप्रमुख कैलासराव उर्फ भास्करराव नळे यांचे ते वडील व ॲड. सागर नळे.ॲड. रविंद्र नळे.प्रविण नळे.यांचे आजोबा होत. त्यांच्यावर राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

जिल्ह्याच्या विकासाचा कृती आराखडा तयार करा -ना.विखे पाटील

जिल्ह्याच्या विकासाचा कृती आराखडा तयार करा -ना.विखे पाटील पाटील



आढावा बैठक संपन्न 

अहिल्यानगर 

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा विकासाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्य शासनाचा १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या विकासाचे उपक्रमही वेगाने राबवावे आणि त्यासाठी कृती आराखडा तयार करा, असे निर्देश  श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर  आदी होते.


पालकमंत्री म्हणाले,  राज्यस्तरावर १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. या धर्तीवर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करून विकासकामांना गती देण्यात यावी. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे गोदावरी घाट विकासाची कामे करण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टी प्रकल्प आणि अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा प्रस्ताव सादर करावा. साहसी पर्यटनाच्यादृष्टीने चंदनपुरी घाटाचा विचार करावा. भंडारदरा येथे स्कुबा डायव्हींगची शक्यता तपासून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावा.

जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने विकासाचे व्हिजन तयार करावे आणि त्यासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करावा. १५ फेब्रुवारीपर्यंत याबाबत सादरीकरण तयार करावे. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी कामे करा, नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने लक्ष द्या. सुपे येथील अतिक्रमण काढण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
******

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद शाळा सावळी विहीर बुद्रुक या शाळेची सहल


शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेची सहल सिन्नर, नाशिक दर्शन, पंचवटी ,काळाराम मंदिर, तारांगण ,अंजनेरी ,त्र्यंबकेश्वर, बुद्ध विहार ,दादासाहेब फाळके स्मारक ,या ठिकाणी सहल गेली होती. या सहलीमध्ये एकूण 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच सहा शिक्षक सहभागी झाले होते. सहलीतून दरवर्षी भौगोलिक ज्ञान ,सामान्य-ज्ञान, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना देखील भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन जर आपण अध्यापन केले तर ते अतिशय प्रभावी होते हे या सहली मागचा उद्देश आहे. या सहलीसाठी गावातील सर्व दानशूर पदाधिकारी आणि पालक यांनी मुलांना भरभरून खाऊ दिला .त्यामध्ये सावळविहीर बुद्रुक गावचे सरपंच ओमेश पाटील जपे यांनी सर्व मुलांना हॉटेलमध्ये जेवण दिले. त्याचप्रमाणे श्री गुरसळ सर ,श्री गणेश आगलावे, श्री विकास जपे उपसरपंच, सागर आरणे, सतीश वाघमारे , अविनाश वाघमारे, शिवाजी झिंजुर्डे , अध्यक्ष सागर जपे, गोरक्षनाथ लिपने, शरद पवार या सर्व ग्रामस्थांनी देखील मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे खाऊचे वाटप केले. यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळाले पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देता आले पाहिजे यासाठी शाळेतील  मुख्याध्यापक श्री नानासाहेब मेहत्रे, श्री दत्ता गायकवाड,  रूपाली मंड्रे ,श्रीमती विद्या गोर्डे, श्रीमती सुचित्रा चवाळे, श्रीमती प्रियंका जाधव, श्री सिताराम गुरसळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सहलीत प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी गोष्टी गप्पा शब्दकोडी अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून प्रवास आनंदी केला प्रवासामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला कोणताही त्रास झाला नाही.



 दरवर्षी सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेची सहल विविध ठिकाणी आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे क्षेत्रभेटी ,विविध शालेय स्पर्धा ,प्रदर्शन विमानतळांना भेटी, विविध लघुउद्योग ,कारागिरांना भेटी, देऊन त्यांच्या मुलाखती घेणे, वार्षिक स्नेहसंमेलन,या मार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जातात. या शाळेचा नावलौकिक तालुक्याबरोबरच जिल्ह्यात देखील झालाआहे. आपली सावळविहीर  बुद्रुक केंद्र शाळा ही सीसीटीव्हींनी युक्त असून सुरक्षित शाळा पालकांच्या दृष्टीने बनलि आहे. त्यामुळे या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची नेहमीच आघाडी असते .शाळेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन केले जाते. शालेय परिसर सुसज्ज आणि अतिशय उत्कृष्ट आहे. शाळेची सहल अतिशय उत्कृष्ट रित्या पार पाडल्याबद्दल सर्व ग्रामस्थांकडून शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक होत आहे त्याचप्रमाणे ही सहल यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे त्याचप्रमाणे पालक राजेंद्र वाघमारे ,श्रीगादी साहेब, ड्रायव्हर श्री व्ही पी शेकडे यांचे सहकार्य लाभले.

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

विखे पाटील आयटीआय येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन

विखे पाटील आयटीआय येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन

अहिल्यानगर
 विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट येथील आयटीआयमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना उद्घाटन समारंभात “आरोग्यम् धनसंपदा” या म्हणीचे महत्त्व सांगितले गेले. खेळामुळे शिस्त, परिश्रम, संघभावना आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

क्रीडा सप्ताहामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

विखे पाटील आयटीआयचे ठिकाण औद्योगिक वसाहतीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. संस्थेत उत्कृष्ट शिक्षण, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, यंत्रसामग्री, अनुभवी शिक्षकवर्ग, मोठे क्रीडांगण आणि निसर्गरम्य परिसर उपलब्ध असल्यामुळे हे महाविद्यालय जिल्ह्यात लोकप्रिय आहे.

या क्रीडा सप्ताहाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर पी. एम. गायकवाड, डॉ. अभिजीत दिवटे, आणि डेप्युटी डायरेक्टर सुनील कलापुरे यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांची संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली शिर्डी येथे भेट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांची संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली शिर्डी येथे भेट



केंद्रीय आयुष मंत्री (स्वातंत्र्य प्रभा र) तसेच सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांची आखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य (AIMLTA) यांच्यावतीने शिर्डी येथे भेट घेण्यात आली.याप्रसंगी संघटनेच्या कार्याबद्दल तसेच प्रलंबित विविध विषयावर मा.महोदय यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून त्यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मा. मंत्री महोदय यांनी संघटनेच्या मागण्यावर लवकरच दिल्ली येथे निर्माण भवनात (मंत्रालयात) बैठक आयोजित करून संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी यथोचित प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय झोनल सेक्रेटरी श्री.रामेश्वर लांडगे, संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. संजयजी उबाळे, तसेच राज्य समन्वयक श्री.सितारामजी विधाते, तसेच अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष श्री,रामचंद्र घनघाव, श्री.सोपान बनकर  उपाध्यक्ष तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना तब्बल दहा लाख रूपयांचा विमा चेक प्रदान - विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार

साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना तब्बल दहा लाख रूपयांचा विमा चेक प्रदान - विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार



शिर्डी 

 साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने गेल्या दोन महिन्यात दुःखद निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना तब्बल दहा लाख रूपयांचा विमा चेक प्रदान करण्यात आला असून मयत सभासदांच्या कुटुंबाच्या दुःखात सोसायटीचे चेअरमन , व्हा चेअरमन व संचालक मंडळ सहभागी आहोत कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबाची  झालेली हानी कधीही न भरून येणारी आहे मात्र निवडणूक काळात केलेल्या आश्वासनाची देखील पूर्ती या निमित्ताने झाली असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले
साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणूक काळात विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी जामीनदार मुक्त संस्था करणार असल्याचे जाहीर केले होते त्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने सभासदांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात त्यानुसार चेअरमन विठ्ठल पवार यांच्या संचालक मंडळाने संस्था व सभासद यांनी प्रत्येकी ५०% विमा हप्ता भरला असुन जामीनदार मुक्त संस्था होण्याच्या दृष्टीने नैसर्गिक मृत्यू विमा सुरक्षा कवच प्राप्त होणे कामी प्रत्येक सभासद व संस्थेचे कर्मचारी यांना नैसर्गिक मृत्यू विमा प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व आज तो राबविण्यात आला आज संस्थेचे सभासद कै.रावसाहेब प्रभाकर गाडेकर, कै. कांता बाबुराव देशमुख व कै.सुरेश तान्हाजी हुसळे यांच्या कुटुंबियांना हा चेक प्रदान करण्यात आला
मयत सभासदांचे वारसांना विमा चेक प्रदान करतांना संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार,व्हा. चेअरमन  पोपटराव कोते संचालक मंडळ तसेच सचिव ,सह. सचिव व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

सोमवार, २० जानेवारी, २०२५

विनामूल्य जयपूर फूट शिबीर २३ जानेवारीला

विनामूल्य जयपूर फूट शिबीर २३ जानेवारीला

नगर 
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा समाजकल्याण विभाग, रत्ना निधी ट्रस्ट मुंबई व रोटरी क्लब ऑफ खडकी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी २०२५ रोजी विनामूल्य जयपूर फूट वाटपासाठी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
गुडघ्याखालील व गुडघ्यावरील पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेऊन त्यांना जयपूर फूट प्रदान केले जातील. मुंबई व पुणे येथील तज्ज्ञ तंत्रज्ञ या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत.

शिबीर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर येथे होईल. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

रेशीमगाठी परीट धोबी वधूवर मेळाव्यात अनोखा विवाह संपन्न :

*रेशीमगाठी परीट धोबी वधूवर मेळाव्यात अनोखा विवाह संपन्न :
       


         रेशीमगाठी उच्चशिक्षित परीट धोबी वधूवर मेळावा म्हणजे हमखास लग्न जमविण्याची हमी  हे ब्रीदवाक्य  परीट धोबी समाजाने दिलेले एकमात्र  विवाह मंडळ होय. याचे कारण म्हणजे मागील तीन मेळाव्यात दरवर्षी किमान 25 विवाह जुळले  गेले आहेत. यावर्षीच्या उच्च शिक्षित  वधू वर मेळाव्यात  354 व्यक्तींनी  वधू वरांसह नोंदणी केली. यात *या वर्षी नव्याने उच्च शिक्षित असलेले व  नसलेले घटस्फोटीत,  विधवा, विधुर, सामील करण्यात आले होते.* या मेळाव्यासाठी दर दिवशी या *मंडळाचे मुख्य संयोजक श्री. अनिल हुपरीकर खडके पुणे, व इतर संयोजक  सौ. सुषमा अमृतकर अमरावती, श्री. शांताराम कारंडे अकलूज, श्री किरण बांदेकर बेळगाव, श्री. राजेंद्र फंड अहिल्यानगर, श्री. योगेश* *रोकडे नाशिक, श्री. महेश यादव कोल्हापूर, श्री. प्रशांत शिंदे कोल्हापूर हे व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत दररोज कार्यक्रमाचे* *नियोजन व  जबाबदारी पार पाडत होते* . *या मेळाव्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने वधू  किंवा वर व त्यांचे  पालक असतील तरच त्यांना  प्रवेश देण्यात येईल. फक्त परदेशातील जे 37 वधुवरांची नोंदणी झाली होती त्यांनाच फक्त पालक आई वडील यांना प्रवेश होता. त्यामुळे 99 टक्के पालकांची उपस्थिती मेळाव्यास होती. या मेळाव्यात वधू  वर व त्यांच्या पालकांना एकमेकात चर्चा करण्यासाठी गार्डनमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तिचा पालकांना चांगला उपयोग झाला. या मेळाव्यात सर्व वधू वरांनी आपला परिचय आपल्या पालकांसह स्टेजवर येऊन दिला.*  *ही या मेळाव्याची अतिशय जमेची बाजू होती.* या *मेळाव्याचे दुसरे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रेशीमगाठी मंडळाने   एका गरिबाघरच्या पितृछत्र हरपलेल्या सोलापूर येथील उमा महेश राक्षे व कोल्हापूर येथील श्री. सुनील बाळू परीट यांचा विवाह हा श्री. अनिलराव हुपरीकर यांनी स्वतः जुळवून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचाराप्रमाणे फक्त लग्नविधी हा  ब्राम्हणाविना मंगलअष्टके म्हणून पार पाडला. या विवाहात  पुणे येथील भाजप नेते तथा ज्यांनी हे माऊली  मंगल कार्यालय गेल्या चार वर्षांपासून रेशीमगाठी  वधू वर मेळाव्यासाठी मोफत दिले असे श्री. राजाभाऊ कदम व  माजी नगरसेविका सौ. मनीषाताई कदम यांनी या विवाहात स्वतः च्या घरचे विवाहकार्य असल्यासारखी जबाबदारी पार पाडली. वधू वरांना सर्व संयोजकांनी प्रत्येकी  पाची पोशाख व संसारोपयोगी  भांडी व रोख रक्कम आहेर दिली. याचबरोबर मेळाव्यात आलेल्या पालकांनी पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आहेर करून या वधू वरांचा प्रपंच उभा करण्यात मदत केली.*  या मेळाव्याच्या उद्घाटन सत्रात फक्त मोजकेच पाहुणे बोलावले होते. यात भाजप नेते श्री. राजाभाऊ कदम, माजी नगरसेविका सौ. मनिषाताई कदम , महाराष्ट्र परीट धोबी समाजाचे उपाध्यक्ष श्री. संतोष भालेकर, श्री. नानासाहेब वाघमारे, श्री. सुधाकर वाघ हे उपस्थित होते. उद्घाटन सत्रात फक्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे प्रतिमा पूजन , श्री. राजेंद्र फंड यांची प्रस्तावना, सौ. सुषमा अमृतकर , अनिलराव हुपरीकर व राजाभाऊ कदम यांचे मनोगत  झाले. कमी वेळात उद्घाटन झाल्याने  वधुवर यांचे परिचय सत्रास भरपूर वेळ मिळाला.  *या चवथ्या रेशीमगाठी परीट धोबी वधूवर व परिचय मेळाव्याचे यश म्हणजे अनेक पालकांनी स्टेजवर येऊन या उच्चशिक्षित मेळावा व घडवून आणलेला विवाह सोहळ्याबद्दल सुंदर प्रतिक्रिया* *दिल्या. तसेच व्हॉट्स ॲप द्वारे अजून ही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.* 
 *मेळाव्यात जेवणानंतरच्या मधल्या मोकळ्या वेळेत *परीट धोबी समाजात सामाजिक काम करणारे  महाराष्ट्रभरातील मान्यवर*यांचा सन्मान चिन्ह  देऊन गौरव* *केला.* यातअनिल देसाई, श्री. विलास रोकडे, ॲड. आकाश  काळे, प्राध्या. डॉ.  माधवराव देसाई, श्री. रमाकांत देसाई, श्री राजाराम परीट श्री मंगेश परीट ,श्री अजित साखळकर, श्री प्रकाश कालेकर लक्ष्मीपुरी मंडल ,श्री राहुल शिंदे ,श्री अभिजीत पोवार, श्री उत्तम भालेकर , सौ विना यादव , श्री. नरेंद्र गायकवाड,श्री. शाम बोराडे, श्री.गिरीश जाधव , पत्रकार श्री. योगेश सगर,श्री. जितेंद्र खैरणार श्री. शैलेश जाधव, संयोजक,  श्री)  शिवाजीराव यादव, श्री नारायण बांदेकर, रिटायर्ड इंजिनीयर, श्री उमेश वाघमारे, श्री. प्रसन्न यादव,सौ. वैशाली महेश बांदेकर , श्री रघुनाथ वाघ, देवराव अवालेकर , श्री. राजेंद्र जगताप यांचा गौरवचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.  मेळाव्यासाठी दिवसभर श्री. ऋषिकेश खडके, मोहन खडके, करुणा खडके, भाग्यश्री खडके, लता केशव रसाळ 0 मोलाची मदत केली.

                   


   या रेशीमगाठी  परीट धोबी वधूवर मेळाव्याने इतर वधुवर मेळावे घेणाऱ्या मंडळांना दाखवून दिले आहे की मेळावा घेण्यासाठी समाजाकडून वर्गणी न घेता ही रजिस्ट्रेशन फी वर सुद्धा मेळावा घेतला जाऊ शकतो.*

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदी जाधव यांची फेरनिवड

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदी जाधव यांची फेरनिवड


राहाता-
शिवसेनेच्या वैद्यकीय सेल च्या उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी साकुरी येथील श्री जितेंद्र जाधव यांची फेर निवड करण्यात आली आहे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे,खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य प्रमुख श्री मंगेश चिवटे व शिवसेना राज्य कार्याध्यक्ष श्री राम राऊत यांनी श्री जितेंद्र जाधव यांची फेरनिवड करण्यात आली सदरील फेरनिवडी चे पत्र त्यांना ठाणे येथील मुख्य कार्यालय मध्ये देण्यात आले लहान पणा पासूनच शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रभावित होऊन श्री जाधव यांनी शिवसेनेचे काम सुरू केले अगोदर श्री उद्धव ठाकरे यांचे सोबत व मागील अडीच वर्षा पासून शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना प्रभावित जाधव यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम सुरू केले मागील अडीच वर्षात त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना भरीव वैद्यकीय मदत ही अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना मिळवून दिली आहे त्यांच्या या निवडी बद्दल मा खासदार सदाशिव लोखंडे,आमदार अमोल खताल, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री कमलाकर कोते, श्री नितिन औताडे,जिल्हा संघटक श्री विजय काळे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे, तालुका प्रमुख मीनाक्षी वाकचौरे, तालुका प्रमुख सागर बोठे,सतीश कोकणे,राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे श्री जाधव यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील शिव सैनिकामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनीलजी नाईक यांनी डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी दिली भेट

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनीलजी नाईक यांनी डॉ.राजेंद्र पिपाडा  यांच्या निवासस्थानी दिली भेट 


राहाता -
               डॉ.राजेंद्र पिपाडा व आमचे राजकारणापलीकडील मैत्रीचे संबंध आहेत मी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासुन पिपाडा आमचे स्नेही आहेत असे मनोगत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी डॉ.पिपाड़ा यांच्या निवासस्थानी भेट दिली असता बोलताना व्यक्त केली. कँबिनेट मंत्री दत्तात्रय भरने तसेच मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनीलजी नाईक  हे ही उपस्थित होते.
        भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी मंत्री दत्तात्रय भरणे व मंत्री इंद्रनील नाईक यांचे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाघमारे,संघपती अनिल पिपाडा,मदन तारगे,नेमीचंद लोढा,नरेंद्र पिपाडा,प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप,मदनलाल पिपाडा,गणेश सोनीमिंडे,चेतन पिपाडा,गौरव पिपाडा,महावीर पिपाडा,साहील पिपाडा आदी उपस्थित होते.
        उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मनोगत व्यक्त करताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, डॉ.राजेंद्र पिपाडा हे  शेतकरी कुटुंबातुन पुढे आलेले आहेत. त्यामुळे मला त्यांच्या कुटुंबाविषयी विशेष आपुलकी आहे त्यामुळे माझ्या शिर्डी दौ-यात मी आवर्जुन डॉ.पिपाडा यांना भेटल्याशिवाय जात नाही. त्याचें वडील श्री मदनलाल पिपाडा यांनी पेरुची शेती कशी फुलवली याबाबत नेहमी सांगत असतात. मुळ शेती व्यवसाय असल्यामुळे त्यांना शेतकरी व शेतक-यांपुढे उभे राहणा-या प्रश्नांविषयी जाण आहे. अशा त्यांच्या कुटुंबाला भेट देताना विशेष आनंद होतो.



सेवाव्रताची भूमिका कायम राहील: डॉ. सुजय विखे पाटील

सेवाव्रताची भूमिका कायम राहील: डॉ. सुजय विखे पाटील




नगर 
अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, "दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अकोळनेर येथे प्रतीक दादा युवा मंचच्या वतीने आयोजित या भव्य सत्कार समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, "पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे." असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले.   
साकळाई योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचा निर्धार



डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, "नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल", असे स्पष्ट केले.
तसेच ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेचा प्रश्न ही सोडविला जाईल व नागरिकांच्या मागणीला यश मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जो आपल्या गावासाठी पाणी देईल, त्यालाच पाठिंबा द्या, असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेला केले. तसेच "जो संकटाच्या काळात आपल्या बाजूने नाही, त्याला संघटनात स्थान नाही." असे देखील मत मांडून कठीण प्रसंगी साथ सोडणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला. 
यासोबतच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विळदघाटात एमआयडीसी उभारून रोजगार निर्मितीचे आश्वासन देखील दिले. तसेच विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना त्यांनी म्हटलं की, लग्नात बुंदी वाटणे किंवा इतर किरकोळ कामं करणे हे लोकप्रतिनिधींचे काम नाही. लोकप्रतिनिधींचे मूळ काम म्हणजे रोजगार निर्माण करणे, महिलांना सुरक्षित ठेवणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे हे आहे, असून मत मांडून "मी ॲक्टिंग करणारा नेता नाही, मी माझ्या माझ्या कामातून बोलतो", असे स्पष्ट करून जनतेला योग्य अपेक्षा ठेवण्याचे आवाहन केले व विकासाच्या दिशेने काम करण्याचे आश्वासनही डॉ. सुजय विखेंनी जनतेला दिले.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२४ जाहिर

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२४ जाहिर                                                                                             
             ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’, ‘निवडुंगाची काटे’, ‘साकव’,’तडजोड’ 'गंपू च्या गोष्टी' समावेश  


 
अहिल्यानगर 

 सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार  ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’, ‘निवडुंगाची काटे’. ‘साकव’,’तडजोड’ 'गंपूच्या गोष्टी 'इत्यादी पुस्तकांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध चे उपाध्यक्ष माजी प्राचार्य जी.पी.ढाकणे व प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांनी दिली. 
      शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार समितीची बैठक नुकतीच अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सचिव सुनील गोसावी,राज्य संघटक डॉ.अशोक कानडे, भगवान राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,त्यावेळी हा निकाल जाहीर करण्यात आला.२०२४ च्या पुस्तकांचे परीक्षण प्रा.डॉ.संजय दवंगे,भाऊसाहेब सावंत,प्रा.डॉ.किशोर धनवटे,सुरेखा घोलप,शर्मिला गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले,त्यावेळी हा निकाल जाहीर करण्यात आला. 
   कादंबरी ‘तडजोड’ निवृत्ती जोरी,संभाजीनगर,कथासंग्रह ‘साकव’ संगीता पुराणिक,पुणे,काव्यसंग्रह ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’ सुनील कोंडके व ‘दंगल होतेच कशी ?’ गौतम डोके,बडनेरा आत्मकथन ‘निवडुंगाची काटे’,जी.जी.कांबळे,लातूर,नाटक प्रभाकर दुपारे ‘समग्र नाटक प्रभाकर दुपारे’,नागपूर, व्यक्तिचित्रण ‘जिव्हाळ्याची माणसं’,भास्कर बंगाळे,पंढरपूर, ललित ‘ऑल इज वेल’ विनय मिरासे,यवतमाळ,संशोधन ग्रंथ ‘मराठी तेलगू भाषिक अनुबंध’ डॉ.दत्ताराम राठोड,अमरावती,  बाल वाड:मय ‘गंपूच्या गोष्टी’ गौरव भुकन,केडगाव, प्रतिनिधीक काव्यसंग्रह ‘काव्यसंकल्प’ प्रा.हनुमान माने,बारामती, संकीर्ण ‘संत तुकाराम एक चिंतन’ प्रा.डॉ.सुभाष बागल,खुलदाबाद यांना जाहिर करण्यात येत आहे.
          २०२४ चे जिल्हास्तरीय पुरस्कार काव्यसंग्रह वेदना, गोकुळ गायकवाड, जामखेड, देव माणसं, दिलीप सोनवणे संगमनेर यांना जाहीर करण्यात येत आहेत. 
        शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद, चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.
      स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,बुके,पुस्तक भेट व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कोहिनूर मंगल कार्यालय,अहिल्यानगर येथे होणा-या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.

माजी नगराध्यक्ष रावसाहेब बोठे यांना वृक्षारोपण रुपी श्रद्धांजली....

माजी नगराध्यक्ष रावसाहेब बोठे यांना वृक्षारोपण रुपी श्रद्धांजली....





 राहाता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष,गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच राहाता तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष रावसाहेब धोंडीबा बोठे पाटील यांच्या दशक्रियादिनी साईयोग फाउंडेशन द्वारे ह.भ.प.जगन्नाथ महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खटकळी पाट येथे नातेवाईकांच्या हस्ते १२ फुटी वट वृक्षाचे रोपण करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच संवर्धनाचे पालकत्व ही स्विकारले.साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांचे ते मेहुणे होते.श्रद्धांजली वाहताना डॉ बापूसाहेब पानगव्हाणे म्हणाले माझ्या 

वैयक्तिक तसेच फाउंडेशनच्या वाटचालीत रावसाहेब पा. बोठे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. ह.भ.प.चौधरी महाराज म्हणाले वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व पर्यावरण 
संरक्षणासाठी साईयोग फाउंडेशनचा हा वृक्षारोपण रूपी अभिवादनाचा उपक्रम प्रशंसनीय नव्हे तर अनुकरणीय आहे.गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण तसेच वाढदिवस अथवा आनंदाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा नामी मंत्र आहे.तसेच यानिमित्ताने भुमातेची सेवा होणार आहे.
याप्रसंगी गं भा सुमनताई रावसाहेब बोठे,भागवत बोठे,सुमन गोरे,विमल डांगे,दत्ता बोठे,प्रसाद बोठे,प्रमोद बोठे,डॉ रुपाली पाटील,माधुरी तांबे,शितल खैरे,रुपाली बोठे,शितल बोठे,वीना बोठे,राजेंद्र डांगे,विशाल पानगव्हाणे,तन्मय बोठे,विमल बोराडे,शांताबाई महाले,अद्वैत पाटील,जानव्ही खैरे,आर्य खैरे,साईश बोठे,आर्वी बोठे,आद्विका बोठे,सान्वी बोठे,कृष्णाली बोठे,भाऊसाहेब बनकर,भरत दवंगे,विलास वाळेकर,मनोज पिपाडा,ॲड गोरखनाथ दंडवते,संजय बाबर,संजय वाघमारे,ज्ञानेश्वर आरणे,विठ्ठल निर्मळ,बाळासाहेब तारगे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...