केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांची संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली शिर्डी येथे भेट
केंद्रीय आयुष मंत्री (स्वातंत्र्य प्रभा र) तसेच सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांची आखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य (AIMLTA) यांच्यावतीने शिर्डी येथे भेट घेण्यात आली.याप्रसंगी संघटनेच्या कार्याबद्दल तसेच प्रलंबित विविध विषयावर मा.महोदय यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून त्यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मा. मंत्री महोदय यांनी संघटनेच्या मागण्यावर लवकरच दिल्ली येथे निर्माण भवनात (मंत्रालयात) बैठक आयोजित करून संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी यथोचित प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय झोनल सेक्रेटरी श्री.रामेश्वर लांडगे, संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. संजयजी उबाळे, तसेच राज्य समन्वयक श्री.सितारामजी विधाते, तसेच अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष श्री,रामचंद्र घनघाव, श्री.सोपान बनकर उपाध्यक्ष तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा