साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना तब्बल दहा लाख रूपयांचा विमा चेक प्रदान - विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार
शिर्डी
साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने गेल्या दोन महिन्यात दुःखद निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना तब्बल दहा लाख रूपयांचा विमा चेक प्रदान करण्यात आला असून मयत सभासदांच्या कुटुंबाच्या दुःखात सोसायटीचे चेअरमन , व्हा चेअरमन व संचालक मंडळ सहभागी आहोत कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबाची झालेली हानी कधीही न भरून येणारी आहे मात्र निवडणूक काळात केलेल्या आश्वासनाची देखील पूर्ती या निमित्ताने झाली असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितलेसाई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणूक काळात विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी जामीनदार मुक्त संस्था करणार असल्याचे जाहीर केले होते त्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने सभासदांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात त्यानुसार चेअरमन विठ्ठल पवार यांच्या संचालक मंडळाने संस्था व सभासद यांनी प्रत्येकी ५०% विमा हप्ता भरला असुन जामीनदार मुक्त संस्था होण्याच्या दृष्टीने नैसर्गिक मृत्यू विमा सुरक्षा कवच प्राप्त होणे कामी प्रत्येक सभासद व संस्थेचे कर्मचारी यांना नैसर्गिक मृत्यू विमा प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व आज तो राबविण्यात आला आज संस्थेचे सभासद कै.रावसाहेब प्रभाकर गाडेकर, कै. कांता बाबुराव देशमुख व कै.सुरेश तान्हाजी हुसळे यांच्या कुटुंबियांना हा चेक प्रदान करण्यात आला
मयत सभासदांचे वारसांना विमा चेक प्रदान करतांना संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार,व्हा. चेअरमन पोपटराव कोते संचालक मंडळ तसेच सचिव ,सह. सचिव व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा