श्री .ग.र.औताडे पाटील विद्यालयात विविध गुण दर्शन सोहळा .
पोहेगाव :-
रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग.र.औताडे पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी बुधवार दिनांक २९/१/२०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता विविध गुण दर्शन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्यात विद्यालयातील विद्यार्थी गायन, वादन, नृत्य आविष्कार सादर करणार आहे . तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी नाटिका देखील सादर करणार आहे. विद्यार्थ्यांच्या या कला गुणांना दाद देण्यासाठी जास्तीत जास्त पालक, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के. शिंदे, पर्यवेक्षक श्री नेहे सी.केज्युनिअर विभागप्रमुख श्री. शिंदे के.बी. ,सांस्कृतिक विभाग समिती , सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, स्थानिक स्कूल सल्लागार समिती , शालेय व्यवस्थापन समिती यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा