*रेशीमगाठी परीट धोबी वधूवर मेळाव्यात अनोखा विवाह संपन्न :
रेशीमगाठी उच्चशिक्षित परीट धोबी वधूवर मेळावा म्हणजे हमखास लग्न जमविण्याची हमी हे ब्रीदवाक्य परीट धोबी समाजाने दिलेले एकमात्र विवाह मंडळ होय. याचे कारण म्हणजे मागील तीन मेळाव्यात दरवर्षी किमान 25 विवाह जुळले गेले आहेत. यावर्षीच्या उच्च शिक्षित वधू वर मेळाव्यात 354 व्यक्तींनी वधू वरांसह नोंदणी केली. यात *या वर्षी नव्याने उच्च शिक्षित असलेले व नसलेले घटस्फोटीत, विधवा, विधुर, सामील करण्यात आले होते.* या मेळाव्यासाठी दर दिवशी या *मंडळाचे मुख्य संयोजक श्री. अनिल हुपरीकर खडके पुणे, व इतर संयोजक सौ. सुषमा अमृतकर अमरावती, श्री. शांताराम कारंडे अकलूज, श्री किरण बांदेकर बेळगाव, श्री. राजेंद्र फंड अहिल्यानगर, श्री. योगेश* *रोकडे नाशिक, श्री. महेश यादव कोल्हापूर, श्री. प्रशांत शिंदे कोल्हापूर हे व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत दररोज कार्यक्रमाचे* *नियोजन व जबाबदारी पार पाडत होते* . *या मेळाव्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने वधू किंवा वर व त्यांचे पालक असतील तरच त्यांना प्रवेश देण्यात येईल. फक्त परदेशातील जे 37 वधुवरांची नोंदणी झाली होती त्यांनाच फक्त पालक आई वडील यांना प्रवेश होता. त्यामुळे 99 टक्के पालकांची उपस्थिती मेळाव्यास होती. या मेळाव्यात वधू वर व त्यांच्या पालकांना एकमेकात चर्चा करण्यासाठी गार्डनमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तिचा पालकांना चांगला उपयोग झाला. या मेळाव्यात सर्व वधू वरांनी आपला परिचय आपल्या पालकांसह स्टेजवर येऊन दिला.* *ही या मेळाव्याची अतिशय जमेची बाजू होती.* या *मेळाव्याचे दुसरे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रेशीमगाठी मंडळाने एका गरिबाघरच्या पितृछत्र हरपलेल्या सोलापूर येथील उमा महेश राक्षे व कोल्हापूर येथील श्री. सुनील बाळू परीट यांचा विवाह हा श्री. अनिलराव हुपरीकर यांनी स्वतः जुळवून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचाराप्रमाणे फक्त लग्नविधी हा ब्राम्हणाविना मंगलअष्टके म्हणून पार पाडला. या विवाहात पुणे येथील भाजप नेते तथा ज्यांनी हे माऊली मंगल कार्यालय गेल्या चार वर्षांपासून रेशीमगाठी वधू वर मेळाव्यासाठी मोफत दिले असे श्री. राजाभाऊ कदम व माजी नगरसेविका सौ. मनीषाताई कदम यांनी या विवाहात स्वतः च्या घरचे विवाहकार्य असल्यासारखी जबाबदारी पार पाडली. वधू वरांना सर्व संयोजकांनी प्रत्येकी पाची पोशाख व संसारोपयोगी भांडी व रोख रक्कम आहेर दिली. याचबरोबर मेळाव्यात आलेल्या पालकांनी पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आहेर करून या वधू वरांचा प्रपंच उभा करण्यात मदत केली.* या मेळाव्याच्या उद्घाटन सत्रात फक्त मोजकेच पाहुणे बोलावले होते. यात भाजप नेते श्री. राजाभाऊ कदम, माजी नगरसेविका सौ. मनिषाताई कदम , महाराष्ट्र परीट धोबी समाजाचे उपाध्यक्ष श्री. संतोष भालेकर, श्री. नानासाहेब वाघमारे, श्री. सुधाकर वाघ हे उपस्थित होते. उद्घाटन सत्रात फक्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे प्रतिमा पूजन , श्री. राजेंद्र फंड यांची प्रस्तावना, सौ. सुषमा अमृतकर , अनिलराव हुपरीकर व राजाभाऊ कदम यांचे मनोगत झाले. कमी वेळात उद्घाटन झाल्याने वधुवर यांचे परिचय सत्रास भरपूर वेळ मिळाला. *या चवथ्या रेशीमगाठी परीट धोबी वधूवर व परिचय मेळाव्याचे यश म्हणजे अनेक पालकांनी स्टेजवर येऊन या उच्चशिक्षित मेळावा व घडवून आणलेला विवाह सोहळ्याबद्दल सुंदर प्रतिक्रिया* *दिल्या. तसेच व्हॉट्स ॲप द्वारे अजून ही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.*
*मेळाव्यात जेवणानंतरच्या मधल्या मोकळ्या वेळेत *परीट धोबी समाजात सामाजिक काम करणारे महाराष्ट्रभरातील मान्यवर*यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव* *केला.* यातअनिल देसाई, श्री. विलास रोकडे, ॲड. आकाश काळे, प्राध्या. डॉ. माधवराव देसाई, श्री. रमाकांत देसाई, श्री राजाराम परीट श्री मंगेश परीट ,श्री अजित साखळकर, श्री प्रकाश कालेकर लक्ष्मीपुरी मंडल ,श्री राहुल शिंदे ,श्री अभिजीत पोवार, श्री उत्तम भालेकर , सौ विना यादव , श्री. नरेंद्र गायकवाड,श्री. शाम बोराडे, श्री.गिरीश जाधव , पत्रकार श्री. योगेश सगर,श्री. जितेंद्र खैरणार श्री. शैलेश जाधव, संयोजक, श्री) शिवाजीराव यादव, श्री नारायण बांदेकर, रिटायर्ड इंजिनीयर, श्री उमेश वाघमारे, श्री. प्रसन्न यादव,सौ. वैशाली महेश बांदेकर , श्री रघुनाथ वाघ, देवराव अवालेकर , श्री. राजेंद्र जगताप यांचा गौरवचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. मेळाव्यासाठी दिवसभर श्री. ऋषिकेश खडके, मोहन खडके, करुणा खडके, भाग्यश्री खडके, लता केशव रसाळ 0 मोलाची मदत केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा