श्री ग.र पाटील विद्यालयाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग भरारी .
पोहेगाव :-
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , संगमनेर जि . अहिल्यानगर . यांचे मार्फत STARS प्रकल्पांतर्गत Hackathon उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये श्री.ग.र. औताडे पाटील विद्यालयातील इ.७ वी तील गुरुकुलचा विद्यार्थी आयुष गणेश जाधव याने फायर फायटर रोबोट बनवून आपला जिल्हास्तरावर सहभाग नोंदविला होता.त्यात त्याला यश मिळवून जिल्हा प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवून गौरविण्यात आले . पुढे त्याला राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे . त्याला त्याचे वर्गशिक्षक श्रीम. बागुल एस.व्ही.यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .त्याचबरोबर विद्यालयाचे मा. मुख्या.श्री. शिंदे एस. के.आणि पर्यवेक्षक श्री.नेहे सी.के. , ज्युनिअर विभागप्रमुख श्री. शिंदे के.बी.यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.
त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे . त्याचे आणि त्याचे पालक श्री. गणेश जाधव यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला . विद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अध्यक्ष श्री आशुतोष काळे, विभागीय अधिकारी श्री एन.एस.बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री प्रमोद तोरणे, श्री. बाबासाहेब नायकवाडी तसेच पोहेगाव स्थानिक स्कूल सल्लागार समिती , शालेय व्यवस्थापन समिती , पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी या यशाबद्दल आयुष गणेश जाधव व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के.शिंदे, पर्यवेक्षक श्री नेहे सी.के. श्रीमती बागुल तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे भरभरून कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा