सोमवार, २ डिसेंबर, २०२४

आमदार अमोल खताळ यांचा साधेपणा…कार्यकर्त्याच्या घरी धावती भेट

आमदार अमोल खताळ यांचा साधेपणा…कार्यकर्त्याच्या घरी धावती भेट 


शिर्डी 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे संगमनेर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आ.अमोल खताळ यांनी  महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास नोंदवला आहे.
आज ते शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी सपत्निक आले असता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सुयोग प्रकाश गोंदकर यांनी घरी भेट देण्याचे विनंती करताच साईबाबांच्या दर्शनानंतर परिवारासोबत असतांना देखिल त्यांच्या घरी जाऊन भेट दिली.
आमदार अमोल खताळ यांचा सरळ स्वभाव व सामन्य कार्यकर्त्याप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा यावेळी सर्वांना अनुभव आला..

युवा आमदार असल्यामुळे त्यांची युवा वर्गात प्रचंड मोठी क्रेझ निर्माण झाली असून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची मोठी उत्सुकता मंदिर परिसरात साईभक्त व युवा वर्गात पहायला मिळाली.
   यावेळी आमदार खताळ यांचा गोंदकर परिवाराच्या वतीने प्रकाश गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गोंदकर,सुयोग गोंदकर,योगेश गोंदकर,विकास गोंदकर,गोरक्ष गोंदकर आदींनी सत्कार केला…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...