रविवार, १ डिसेंबर, २०२४

भारतीय लहुजी सेनेचा मानाचा व प्रतिष्ठित असा जांभेकर समाजभूषण पुरस्कार पत्रकार कोंडीराम नेहे यांना नुकताच एका मोठ्या कार्यक्रमात करण्यात आला प्रदान!

 भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित व मानाचा असा जांभेकर समाजभूषण पुरस्कार नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोहगाव (प्रवरानगर) येथील ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांना श्रीरामपूर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या जन्मोत्सव सोहळा दिनी 30 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदान करण्यात आला. हा मानाचा व प्रतिष्ठित जांभेकर समाज भूषण पुरस्कार कोंडीराम नेहे यांना प्रदान करण्यात आल्याबद्दल  त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.     श्रीरामपूर येथे क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचा जन्मोत्सव सोहळा 30 नंबर 2024 रोजी श्रीरामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन परिसरात विविध कार्यक्रमांनी व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा जांभेकर समाजभूषण पुरस्कार सन 2024 या सालचा हा पुरस्कार लोहगाव प्रवरानगर येथील ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांना भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण व सल्लागार रमेश बी. कोळेकर आदींच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पत्रकार कोंडीराम नेहे यांच्या परिवारातील सुनिता नेहे, धनंजय नेहे, शिवांश नेहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते  संजय इनामके ,पत्रकार विजयराव बोडखे,प्रविण नेहे.सुवर्णा नेहे .रंगोली नेहे.जयश भुसाळ. आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यात विशेष योगदान देऊन सर्व सामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले असल्याने कोंडीराम नेहे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय लहुजी सेनेच्या वतीने  हा मानाचा प्रतिष्ठित असा हा जांभेकर समाजभूषण पुरस्कार कोंडीराम नेहे यांना देऊन  यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार व दैनिक संग्राम सत्तेचा या डिजिटल पोर्टल न्यूज चे संपादक कोंडीराम नेहे अनेक वर्षापासून पत्रकारितेत काम करत असून त्यांनी दैनिक प्रभात, दैनिक गावकरी तसेच दै.सार्वमत, आदी अनेक वृत्तपत्रात काम केलेले आहे व काम करत आहे. पत्रकारिता करण्याबरोबरच सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत इथे ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीत संचालकही  ते होते.पत्रकारितेतून त्यांनी सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याकडे अधिक भर देण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय लहुजी सेनेच्या वतीने कोंडीराम नेहे यांना जांभेकर समाजभूषण हा मानाचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आल्याने त्यांचे तालुक्यातील, जिल्ह्यातील पत्रकार तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी हा पुरस्कार प्राप्त पत्रकार कोंडीराम नेहे यांनी सांगितले की,मला हा पुरस्कार भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दिला गेला त्याबद्दल मी या भारतीय लहुजी सेनेचे आभारी असून या पुरस्कारामुळे मला आणखी काम करण्याची एक ऊर्जा मिळेल व या अधिक मिळालेल्या ऊर्जेमुळे मी आणखी जोमाने यापुढे पत्रकारितेच्या माध्यमातून जोमाने सामाजिक काम करेल. असे आश्वासन यावेळी त्यांनी देत    भारतीय लहुजी सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पुरस्कार मिळाल्यानंतर सत्कार तसेच अभिनंदन करणाऱ्यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भारतीय लहुजी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,पत्रकार व हितचिंतक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन   राहाता  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे प...