साईयोग फाउंडेशन द्वारे शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.....
राहाता येथील साईयोग फाउंडेशन व दहेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज माझी वसुंधरा ५-० अंतर्गत रविवारी सकाळी खटकळी परिसर येथे वृक्षारोपण करून अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी १० ते १२ फुटी वड,रेन ट्री,गुलमोहर आदी झाडांचे रोपण करण्यात आले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राहाता नगरपालिके द्वारे खटकळी परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.साईयोग फाउंडेशन,दहेगाव ग्रामस्थ व राहाता नगरपालिच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यंत खटकळी परिसरात आज मितीस शंभर मोठी झाडे लावण्यात आली असून संगोपनही करण्यात येत आहे.याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,बाभळेश्वर पायर्न्सचे वैज्ञानिक भरत दवंगे,दहेगाव चे संदीप डांगे,सुभाष डांगे,भाऊसाहेब बनकर,विलास वाळेकर,पांडुरंग गायकवाड,गोरखनाथ दंडवते,संजय बाबर,बबलू फटांगरे,संजय वाघमारे,दिपक दंडवते,उमेश लुटे,शिवाजी पोटे,संदिप जेजुरकर,रंगनाथ सदाफळ,भागवत वाघमारे,प्रणव लावर आदी साईयोग फाउंडेशन चे मान्यवर उपस्थित होते.
चौकट
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भरघोस निधीतून राहाता नगरपालिकेने खटकली परिसराचे सुशोभीकरण केले आहे.दशक्रियेसाठी व केशवपन साठी स्वतंत्र ओटे,बाथरूम तसेच कपडे बदलण्यासाठी खोल्या व प्रवचन आदी धार्मिक विधींसाठी उत्तम सोय केली आहे.अजून काम प्रगतीपथावर आहे.आलेल्या नागरिकांनी विधी झाल्यानंतर झालेला कचरा इतरत्र न टाकता एकच ठिकाणी गोळा करून नगरपालिकेला सहकार्य करावे.वृक्षारोपण केलेले झाडे मोठे झाल्यावर सौंदर्यात निश्चतच भर पडणार आहे.तसेच स्वच्छता राखल्यास जागेचे पावित्र्य राखले जाईल.
डॉ बापूसाहेब पानगव्हाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा