मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

आधार च्या खाजगी करना विरोधात नगर जिल्ह्यातील केंद्र चालक हाय कोर्टात

आधार च्या खाजगी करना विरोधात नगर जिल्ह्यातील केंद्र चालक हाय कोर्टात
 

राहता –

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील तीन ते चार वर्षापासून एकात्मिक बालविकास प्रकल्प चे आधार नोंदणी चे काम हे शासकीय कंपनी महा आई टी या कंपनी मार्फत सुरळीत सुरू होते परंतु मागील तीन ते चार दिवसापूर्वी आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी एक परिपत्रक काढून सर्व आधार नोंदणी संच हे दोन दिवसात एका खाजगी कंपनी ला जमा करण्याचे आदेश काढले याविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व आधार नोंदणी चालक एकवटले असून त्याविरोधात सर्व आधार नोंदणी चालक यांनी औरंगाबाद हाय कोर्ट मध्ये याचिका दाखल केली आहे

वास्तविक महा आई टी मार्फत मागील तीन वर्षामध्ये आधार चे काम सुरू असताना सदरील ६९ आधार केंद्र धारक यांनी शासनाकडे पन्नास हजार रुपये इतकी रक्कम आधार केंद्र चालवणे पोटी अनामत रक्कम जमा केली आहे या ६९ लोकांचे लाखों रुपये शासनाकडे पडून आहे असे असताना सुद्धा व महा आई टी या कंपनी चा शासना सोबत असलेला करार अडद्याप संपलेला नाही तरी सुद्धा  आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी परस्पर सदरील आधार संच जमा करणे बाबत आदेश पारित केले आहे यामध्ये कुणाचा व्ययक्तिक आर्थिक फायदा आहे का हे सुद्धा शोधणे आता गरजेचे आहे आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी आदेश पारित करणे अगोदर शासनाची परवानगी घेतली का ? याबाबत सुद्धा माहिती उपलब्ध नाही तरी सदरील आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र धारक यांनी उच्च न्यायालय चे दार ठोटावले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...