शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

गणेश कारखान्याचा प्रथमच तीन हजार रुपये दर..!

 गणेश कारखान्याचा प्रथमच तीन हजार रुपये दर..!



राहाता  
      गणेश कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तीन हजार रुपये उसाला दर मिळाल्याने चैतन्याचे वातावरण पसरले आहे. कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद, शेतकरी यांनी आनंदोत्सव साजरा केला
कर्मचाऱ्यांना पगार बोनस यासह रिटेन्शन रक्कम मिळाल्याने प्रथमच इतकी आनंदात दिवाळी आम्ही साजरी करतो आहोत, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ज्यांनी योगदान दिले असे ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे आभार सर्वांनी व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे सुधीर  लहारे,  विजय दंडवते,  अॅड. नारायण कार्ले, भगवान टिळेकर, डॉ. एकनाथ गोंदकर, संपतराव चौधरी, अनिल गाढवे,बाळासाहेब चोळके, महेंद्र गोर्डे, संपतराव हिंगे, अरविंद फोपसे, आलेश कापसे, नानासाहेब नळे, विष्णुपंत शेळके, विनायक देठे, सचिन आहेर, सुभाष कापसे आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील हंगामात २ लाख १७ हजार टन इतके गाळप  झाले. जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यात सर्वाधिक साखर गाळप उतारा गणेशचा निघाला. उसाची उपलब्धता कमी असताना देखील हंगाम यशस्वी करून दाखवला. त्याचप्रमाणे चालू हंगामात देखील एकजुटीने कार्यरत राहून आ. बाळासाहेब थोरात व युवानेते विवेक कोल्हे यांनी अनेक अडचणी आल्यानंतरही कारखाना यशस्वी सुरू केला. अनेक राजकीय अडचणी कारखान्याला कर्ज मिळण्यासाठी आल्या. त्यावर मात करून घडी बसविण्यात यशस्वी झाले.
मागील संचालक मंडळाच्या काळात पगार आणि इतर रकमा थकित होत्या. आर्थिक घडी विस्कटून गेली होती. त्यामुळे नवीन संचालक मंडळाला अनेक आव्हानांना तोंड देऊन हे प्रश्न सोडवावे लागत आहेत. ऊस पळवापळवी करून कारखान्याला त्रास देऊ नये आणि गणेश कारखाना विरोधकांनी अडथळे
आणू नये. नुकतेच कोट्यवधी रुपये शेतकरी, कर्मचाऱ्यांना अदा झाल्याने राहाता आणि गणेश परिसरात बाजारपेठ फुलण्यासाठी मदत झाली आहे.
उसाला २०२३-२४ हंगामात सर्वाधिक तीन हजार रुपये दर मिळाला आणि कर्मचारी बांधवांचे देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत झाली. यासह सभासद आणि ऊस देणारे बिगर सभासद यांनाही मोफत साखर देण्याचा पूर्वनियोजनाप्रमाणे झालेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...