रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

साईयोग फाउंडेशन द्वारे वृक्षारोपण करून मान्यवरांचा सन्मान ..

 साईयोग फाउंडेशन द्वारे वृक्षारोपण करून मान्यवरांचा सन्मान ..



राहाता -

माझी वसुंधरा ४-० अंतर्गत साईयोग फाउंडेशन राहाता द्वारे आज रविवारी सकाळी कातनाला परिसर येथे पुणे येथील गजानन कन्स्ट्रक्शन चे संचालक उद्योजक अवधुत शिवाजीराव मांढरे पा. व उच्चशिक्षित दंतरोग तज्ञ डॉ शिरीष प्रतापराव गमे पा.यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांचा फेटा बांधून श्रीसाई शाल देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रारंभी साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बबलू फटांगरे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.ते म्हणाले डॉ.शिरीष प्रतापराव गमे यांनी दंतरोग विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम विशेष श्रेणीत पूर्ण करून MDS orthodentist ही पदवी प्राप्त केली.ही बाब साई योग फाउंडेशन व राहाता शहरासाठी भूषणावह आहे.तसेच साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेले सर्जन डॉ अजिंक्य पानगव्हाणे यांचे मेहुणे अवधुत मांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक हस्ते वृक्षारोपण करून सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना दोन्ही सत्कारमूर्तींनी अश्या अनोख्या पद्धतीने सन्मानित केल्याबद्दल साईयोग फाऊंडेशनचे आभार मानले.शेवटी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी दोघांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच सणासुदीच्या काळात इतक्या सकाळी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे ,प्रतापराव गमे,संदिप डांगे,सुभाष डांगे,प्रभाकर डांगे,ॲड गोरख दंडवते,अनिल सातव,मनोज पिपाडा,नारायण गाडेकर,विठ्ठल निर्मळ,सिताराम बावके,रंगनाथ सदाफळ,उमेश लुटे,रविंद्र धस,बाळासाहेब तारगे,प्रभाकर नावकर, सौ.वृशाली अवधूत मांढरे,अवधूत मांढरे,व्यंकटेश मांढरे,डॉ.शिरीष गमे,डॉ.अजिंक्य पानगव्हाणे,पियुष पानगव्हाणे इत्यादी साईयोग फाऊंडेशनचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप केला.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...