साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी ऐतिहासिक दिवस…!
शिर्डी प्रतिनिधी :
मा. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॅा सुजय दादा विखे पाटील साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री गाडीलकर साहेब, उपकार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुळहुले तसेच राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद..
श्री साईबाबा संस्थान मधील सुमारे ५९८ कर्मचारी आणि आउटसोर्सिंग मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने सरकारात्मक अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज या ऐतिहासिक निर्णयाचे नियुक्तीपत्र महसुल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत होतो. शिवाय दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा संघर्षही मोठा झाला. अशा सर्व परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्याची वचनपूर्ती आजच्या निर्णयाने करता आल्याचे मला समाधान वाटत आहे असे ना विखे पाटील यांनी सांगितले.
नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्षनाथ गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलहूले, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर, डॉ. सुजयदादा विखे पाटील, सभापती श्री. ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष श्री. कैलास कोते, श्री. अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.कमलाकर कोते, कामगारांच्या पतसंस्थेचे चेअरमन श्री. विठ्ठलराव तुकाराम पवार यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा