उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबईत सागर बंगल्यावर भेट......
राहाता=
श्री.साईबाबा संस्थानमध्ये इनसोर्स मध्ये कामगारांना संस्थान आस्थापनेवर व आऊटसोर्स कामगारांना इनसोर्स मध्ये घेण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई येथे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन त्यांना निवेदन देवुन चर्चा करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, श्री.साईबाबा संस्थानमध्ये काम करणा-या इनसोर्स कामगारांना संस्थानच्या आस्थापनेवर घेण्यात यावे तसेच आऊटसोर्समध्ये काम करणा-या कामगारांना इनसोर्स मध्ये घेण्यात यावे. श्री.साईबाबा संस्थानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आऊटसोर्स मध्ये हजारो कामगार आपली सेवा देत आहे. अत्यल्प वेतनात त्यांना काम करावे लागत असल्यामुळे आजच्या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. मुला-मुलींचे शिक्षण असेल, रुग्णालयाचा खर्च असेल, तसेच दैनंदिन गरजा मिळणा-या वेतनात पूर्ण होत नाही. गेल्या अनेक वर्षापासून सदर कामगार संस्थानमध्ये आपली सेवा देत आहेत. तरी त्यांना श्री.साईबाबा संस्थानमध्ये इनसोर्समध्ये समाविष्ट करण्यात यावे ही विनंती. यावेळी दिलेल्या निवेदनावर उपमुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.
चौकट-
शिर्डी संस्थानमध्ये 2009 साली 1052 कामगार कायम होण्याच्या वेळीच 598 कामगारांनाही न्याय मिळणे अपेक्षित होते परंतु त्यांच्यावर अन्याय झाला. विधानसभेच्या सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायम करण्याचा शब्द दिला होता तसेच माझ्या बरोबर या कामगारांचे शिष्टमंडळ फडणवीस साहेबांना भेटायचे त्यावेळी तुम्ही चिंता करू नका तुम्हाला कायम करू हे आश्वासन पूर्ण करून कामगारांना अखेर न्याय दिला. परंतु 2009 ते 2024 चा वेतनातील फरक मिळावा व कामगारांना दिलेल्या लेखी आदेशात 2009 च्या आकृतीबंधाचा उल्लेख नाही याबाबींसाठी पाठपुरावा करणार आहोत. या कामगारांच्या विजयाचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब व चिकाटीने पाठपुरावा करणारे कामगार यांनाच आपण देत आहोत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मुंबई भेटीत आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा