संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर : अहिल्यान...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
आज आम्ही पुणे येथून येवला येथे लग्नासाठी शिर्डी मार्गे जात असताना कवठे कमलेश्वर जवळ एका वळणावर आमची गाडी घसरून नाल्यात कोसळली. त...
-
धार्मिक परंपरेत विखे पाटील परिवाराचे योगदान! धनगरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह कमिटीकडे १०१ साखर पोती सुपूर्त राहाता तालुक्यातील...





follow and share
उत्तर द्याहटवा