तरुणाचा मृत्यू
राहाता :-
बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पिंपरी - निर्मळ वरून शिर्डीला जात असणारी अल्टो ( एम.एच १७ सी एम ८९२७ ) गाडी व नगर दिशेने जात असणाऱ्या कंटेनरमध्ये ( जीजे २७ टी.टी ७२३८ ) केलवड गावात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने शिर्डी येथील तरुण मुलगा प्रज्वल संजय जगताप ( वय १९ ) याचा मृत्यू झाला.अपघात झालेल्या ठिकाणी गेल्या ४ ते ५ दिवसापासून चोरट्यांचे सत्र सुरू आहे अपघात होताच याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली याचवेळी चोरट्यांनी संधीचा फायदा घेत केलवड गावातील ग्रामस्थ चंद्रकांत पुंजाजी गमे यांनी रस्त्यात लावलेली दुचारी ( एम.एच १७ ए.एम.८५०३ ) चोरीला गेल्याने आणखी एक खळबळ उडाली .
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अपघात होताच केलवड गावातील नागरिकांनी साईबाबा रुग्णालयातील अँब्युलन्स बोलाऊन तरुण जगताप व त्या गाडीत असणाऱ्या महिलेला रुग्णालयात पाठविले , यावेळी उपचार घेत असताना युवकाचा मृत्यू झाला . तर त्या महिलेवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. कंटेनर बायपास रस्त्यात पूर्णपणे आडवा कोसळल्याने काही काळ वाहतून पूर्णपणे बंद झाली होती, ही वाहतूक लोणी दिशेने वळविण्यात आली . या संपूर्ण घटनेत पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे हे पहाटे चार वाजेपर्यंत कार्यवाही करत होते . कंटेनर व अल्टो गाडी राहाता पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून याविषयी ३७९ / २०२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार एन. यु पेटारे हे करत आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा