राहाता =
जगाच्या बाजारात स्वार्थ, राजकारण, नफा तोटा, यापासून कोसो दूर असलेली विविध वयोगटातील निरागस बौद्धिक अक्षम असलेली दिव्यांग मुले मुली आज राहाता येथील " दिव्यांग "मुलांसाठीचे व्यावसायिक शिक्षण/ प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत आढळून आली. या मुलांसाठी लायन्स क्लबच्या हंगर ऍक्टिव्हिटी अंतर्गत लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे ला. सिराज शेख यांनी मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला . भोजन करतांना मुलांच्या चेहऱ्यावरील व जेवण आवडल्याची स्वतः हुन बोटाने दिलेल्या पावतीने राहाता सह्याद्री लायन्स क्लबचे समाधान झाल्याचे ला. ॲड. सुधीर बोठे म्हणाले.
लायन्स क्लब राहाता सह्याद्री नेहमीच समाजातील उपेक्षित व गरजवंत यांचेसाठी नेहमी धावून जात असते. राहाता येथे नव्यानेच स्थापन झालेल्या रखुमाई बहुउद्देशीय संस्थेने राहाता शहर व परिसरातील नागरिकांच्या बौद्धिक अक्षम मुलांसाठी एकांत दिंव्यांग व्यावसायिक शिक्षण /प्रशिक्षण शाळा सुरू केल्याने या मुलांची शिक्षणाची चागली सोय झाली. अगदीच स्वतः च्या हाताने खाऊ शकत नसलेल्या मुलांना येथील शिक्षिका स्वतः च्या हाताने भरवतात. संस्थेसाठी जागा व बांधकामासाठी काही दानशूर व्यक्तीकडून मदत व संस्थाचालक श्री बबनराव जाधव हे रिटायर्ड मुख्याध्यापक यांनी स्वतः ची जमापुंजी खर्च करून ही शाळा उभा केली. अजूनही अनेक छोट्या मोठ्या गोष्टीची गरज या शाळेस आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थेने ही मदत व अजूनही अशी बौद्धिक अक्षम मुले मुली असतील तर कळवावे असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. अमिता जाधव म्हणाल्या.
राहाता सह्याद्री लायन्स क्लबचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड म्हणाले की आपला हा उपक्रम अतिशय वाखाणनेजोगा असून यामुळे बौद्धिक अक्षम मुले असलेल्या पालकांचीही चांगली सोय झाली आहे. ज्या ज्या वेळी आपणास मदत लागेल तेथे राहाता सह्याद्री लायन्स क्लब आपल्या मदतीस हजर राहील. राहाता सह्याद्री लायन्स क्लबचे संस्थापक श्री. विनोद गाडेकर यांनी आभार मानले. यावेळी आजचे आयोजक ला. सिराज शेख, व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, ला. सत्यम सदाफळ , ला. बापू गायकवाड, ला. सचिन लोढा, या संस्थेचे संस्थापक श्री. बबनराव जाधव, मुख्याध्यापिका सौ.अमिता जाधव, सचिव कामिनी जाधव या उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा