शिर्डी प्रतिनिधी :
आज दिनांक १ जुलै २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला- मुलींची शाळा शिर्डी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने राहाता तालुका असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नचिकेत वर्पे यांचे कडून विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना डॉ. नचिकेत वर्पे म्हणाले "या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसाठी दर महिन्यातून एक व्हिजिट देण्याची कबूल केले".
विद्यालयातील विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ.नचिकेत वर्पे यांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा