सोमवार, १ जुलै, २०२४

यूपीएससी पास होऊन कोते यांनी शिर्डीचा लौकिक वाढवला

यूपीएससी पास होऊन कोते यांनी शिर्डीचा लौकिक वाढवला

शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी प्रतिनिधी 
        भारतीय प्रशासन सेवेची अर्थात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय आर्थिक गुन्हे शाखेच्या उपसंचालक पदी नियुक्ती मिळविलेले अनिल विष्णू कोते यांनी उच्चपदस्थ अधिकारी होऊन शिर्डी शहराच्या नावलौकिक वाढविला आहे त्यांचा आदर्श शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांनी घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे ध्येया मेहनतीने वाटचाल करावी असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी केले आहे
     शिर्डी येथील भूमिपुत्र अनिल विष्णू कोते यांनी नुकतीच भारतीय प्रशासन सेवेची अर्थात यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून केंद्रीय आर्थिक गुन्हे शाखेच्या उपसंचालक पदी नियुक्ती मिळवली आहे याबद्दल शिर्डी शहरातील शिवसेना कार्यालय असलेल्या शिवालय येथे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी अनिल कोते यांचा सत्कार केला याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते 
    जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यावेळी म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय अवस्थेतच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे अनिल कोते यांनी सुरुवातीपासूनच उच्चपदस्थ अधिकारी बनण्याचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी अनिल ने ध्येयापासून विचलित न होता जिद्द चिकाटी व मेहनतीने वाटचाल केली ध्येय गाठण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करून सातत्यपूर्ण अभ्यास केला तर यश हमखास प्राप्त होते व स्वतःबरोबरच कुटुंबांची सुद्धा स्वप्नपूर्ती होऊन संकल्प सिद्धीस जातो याचा वस्तू पाठ अनिल याने शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांना घालून दिला आहे त्याचा आदर्श घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे आपलं लक्ष केंद्रित करून स्वतः अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच गावाचे व आई वडिलांचे नाव उज्वल करावे असे आवाहन यावेळी कमलाकर कोते यांनी केले विलास कोते,राहुल गोदकर,विजय कोते,जयराम कांदळकर,शहादेव बडे,पत्नी ऋशाली कोते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...