मंगळवार, २ जुलै, २०२४

स्टेट बँकेचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

स्टेट बँकेचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

राहाता (प्रतिनिधी) भारतीय स्टेट बँकेला स्थापन होऊन आज ६९ वर्षे पूर्ण होत असून पूर्ण देशभरात हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्त राहाता शाखेमध्ये सुद्धा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या शाखेला फुगेची सजावट तर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
 याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. तर शाखा व्यवस्थापक शिवशंकर अवघडे यांचा ग्राहकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शाखा व्यवस्थापक शिवशंकर अवघडे म्हणाले की स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै १९५५ रोजी झाले असून आज बँकेच्या देशभरात १६८९३ शाखा कार्यरत असून एकूण सुमारे ३ लाखापेक्षा जास्त कर्मचारी जगभरात काम करत असून जवळपास ५० कोटी पेक्षा जास्त ग्राहक या बँकेची जगभरात जोडले गेलेले आहेत. बँकेमध्ये मिळणाऱ्या विविध सुविधांचा फायदा ग्राहकांनी घ्यावा ग्राहकांनी बँकेत व्यवहार करताना एटीएम आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना जागरूक करावे तसेच अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. सुरक्षित व्यवहारातून स्वतः बरोबरच बँकेची सुरक्षिता ठेवता येईल दैनंदिन व्यवहारासाठी इनो कॅश, इन ट्रांजेक्शन चा जास्तीत जास्त वापर करावा आर्थिक विमा कर्ज, विमा वैयक्तिक,विमा आरोग्य ,विमा पीएम सुरक्षा विमा, या सुविधांचा फायदा घ्यावा शेतकरी ,नोकरदार,पेन्शनर छोटे-मोठे व्यवसायिक उद्योजक यांना सुलभ पद्धतीने कर्ज दिले जाते याचाही लाभ संबंधितांनी घ्यावा असे आव्हान अवघडे यांनी केले.
या वेळी माजी मुख्याध्यापक सर्जेराव मते, मोहनराव बोरुडे,नानासाहेब मते, रमेश शिंदे,भानुदास गाडेकर, गंगाधर कदम उद्योजक सुरेश गमे,कमलेश चोरडिया,मयूर कुंभकर्ण यांनी मनोगत व्यक्त करून बँकेकडून ग्राहकांच्या अपेक्षा व समस्या सोडवण्यासाठी करावयाच्या प्रयत्न यावर चर्चा करून बँकेला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उद्योजक मुन्ना शेख ,अशोक शिंदे ,रवी गायकवाड ,तुपे सर बाळासाहेब निर्मळ ,प्रल्हाद दंडवते ,बाळासाहेब गमे ,रमेश सोमवंशी उद्धव देव्हारे, योगेश म्हस्के, विक्रांत दंडवते, प्रवीण देशमुख, वैद्यही चौधरी, सुलोचना वळवी, समीक्षा दातार,किरण पाचोरे,साई गायकवाड, अभिषेक जाधव, साई गोरे,आप्पा गुंजाळ, प्रशांत धापटकर ,नितीन गाडेकर ,विजय दिघे यांच्यासह ग्राहक,कर्मचारी उपस्थित होते.तर सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...