मंगळवार, २ जुलै, २०२४

नवीन शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी खुले करा; अन्यथा आंदोलन

नवीन शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी खुले करा; अन्यथा आंदोलन

युवकांचा साईसंस्थान प्रशासनाला इशारा

शिर्डी प्रतिनिधी :  

साईबाबा संस्थानने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेले नवीन शैक्षणिक संकुलाचे बांधकाम दीड वर्षापासून पूर्ण झाले तरी शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी खुले झाले नाही. शैक्षणिक संकुल १० दिवसांत सुरू न झाल्यास शिर्डीतील तरुण संस्थान प्रशासन दालनात घंटानाद तसेच ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिला आहे.

शिर्डी युवा ग्रामस्थांनी साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शिर्डी परिसरातील सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्थाने पहिली ते १२ वी या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिक्षण मोफत केले आहे. तसेच एलकेजी ते १० परंतु इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर इंग्लिश मीडियम शाळेच्या तुलनेत कमी शैक्षणिक शुल्क घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश व मराठी आशा दोन्ही भाषेचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. साईबाबा संस्थानच्या भक्त निवास पाचशे रूम येथे विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी तसेच अभ्यासाकरिता पुरेशी जागा उपलब्ध व्हावी यासाठी संस्थाने निमगाव निघोज शिवारात ५ एकर जागेत दीड कोटी रुपये खर्चाचे भव्य असे शैक्षणिक संकुल उभारले आहे. या शैक्षणिक संकुलाचे बांधकाम जवळपास दीड वर्षांपूवी पूर्ण झाले आहे. तरी देखील साई संस्थांने नवीन जागेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल सुरू केले नाही. जुन्या जागेत जागे अभावी शाळा व महाविद्यालय दोन शिफ्ट मध्ये सुरू आहे. या ठिकाणी विद्याथ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. नवीन शैक्षणिक संकुलात पहिली ते दहावी व अकरावी बारावी तसेच आर्ट, कॉमर्स सायन्स, एफ वाय, एस वाय, व टी वाय पर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार असून याच ठिकाणी एलकेजी ते दहावीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. मुलींसाठी पूर्ण शिक्षण मोफत असल्याने विद्यार्थिनींची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी डिजिटल क्लासरूमची सुविधा, प्रशस्त मैदान, सुसज्ज इमारत अशा प्रकारे नवीन शैक्षणिक संकुलाची उभारणी केली असताना देखील साईबाबा संस्थाने अद्याप विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक संकुल खुले केले नाही. साई संस्थान प्रशासनाने १० जुलै पर्यंत नवीन जागेतील शैक्षणिक संकुल सुरू करावे अन्यथा ११ जुलै रोजी शिर्डीतील युवा ग्रामस्थ साई संस्थान प्रशासन कार्यालयात घंटानाद तसेच ठिय्या आंदोलन करून नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करणार असल्याचे नितिन उत्तम कोते, गोपीनाथ गोंदकर, निलेश कोते, दीपक वारूळे, योगेश गोंदकर, ताराचंद कोते, रवींद्र गोंदकर, विकास गोंदकर, सुधीर शिंदे, सुनील गोंदकर, तान्हाजी गोंदकर, दत्तू कोते मुकुंद गोंदकर, वैभव कोते, पप्पू शेजवल, नितिन अशोक कोते, विशाल कोते, नरेश सुराणा, आकाश कोते, मनोज मयूर, निलेश नागरे, पंडित कोते, प्रसाद सुरांजे, गणेश सोनावणे आदी युवा ग्रामस्थांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...