राहता=
आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर्स व रुग्णांची प्राण वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक जुलै हा दिवस साजरा केला जातो
ग्रामीण रुग्णालय राहता येथील सर्व डॉक्टरच्यांनी कोरोना काळामध्ये अतिशय उत्तम दर्जाची सेवा देऊन रुग्णांना दिलासा देण्याचे महत्त्वाचे काम केलेला आहे
लायन्स क्लब राहता नेहमीच सामाजिक कामातून व लोक हितार्थ कामे करत आहे लायन्स क्लब राहते चे अध्यक्ष लायन इंजिनिअर प्रकाश सदाफळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय राहता येथे डॉक्टर दे साजरा करण्यात आला याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे सर यांनी लायन्स क्लब करत असलेल्या कामाचे कौतुक करून राहता लायन्स क्लबचे गुणगौरव केले, राहाता लायन्स क्लब नेहमीच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी व रुग्णांना दिलासा देण्याचे काम करत असतात व त्यांच्या कार्याची दखल घेत असतात ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे
डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर संजय उबाळे यांनी प्रास्ताविक करून डॉक्टरांविषयी आपले मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी लायन्स क्लब राहताचे सेक्रेटरी एडवोकेट दिनेश कारले ,पीआरओ अडवोकेट गोरख तात्या दंडवते ,उपाध्यक्ष राजाभाऊ बांगर, लायन विजय धनवटे , लायन रतन चौधरी राजुभाईपठाण
डॉक्टर संदीप बनसोडे,डॉक्टर शर्वरी कुलकर्णी, डॉक्टर गुरफान शेख डॉक्टर विजय मस्के डॉक्टर रवी घोगरे डॉक्टर गाडेकर मॅडम डॉक्टर मालकर मॅडम डॉक्टर पवार मॅडम सिस्टर जाधव एलबी सिस्टर कांबळे श्री संतोष भडांगे श्री बाबासाहेब गाडेकर श्री सत्यवान कॉल्हे श्री घनश्याम शिंदे श्रीमती सरला तायडे, श्रीमती स्मिता मुरादे ,श्रीमती आसावरी बेंद्रे ,श्रीमती मोरे श्री कुसाळकर व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
लायन्स क्लबच्या सर्व सभासद यांनी डॉक्टर डेनिमित्त आपली समाजाप्रती असलेली भावना व्यक्त केली व सर्वतोपरी मदत केली लायन्स क्लबच्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने श्री संतोष भडांगे यांनी आभार व्यक्त केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा