सोमवार, १ जुलै, २०२४

वृक्षारोपण सप्ताहाची सुरुवात डॉक्टर्स डे ने.

वृक्षारोपण सप्ताहाची सुरुवात डॉक्टर्स डे ने.....
राहाता=
राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे गेली आठ वर्षांपासून एक जुलै ते सात जुलै हा वृक्षरोपण सप्ताह म्हणून साजरा केला जातो.आज डॉक्टर्स डे असल्याने दहेगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने सकाळी खटकळी परिसर दहेगाव येथे राहाता परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील गुरूवर्य डॉ पांडुरंग गुंजाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सप्ताहाची सुरुवात करून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.या सर्व झाडांचे पालकत्व दहेगाव ग्रामस्थांनी घेतले आहे.साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य विलास वाळेकर यांचाही वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
साईयोग फाउंडेशनने राहाता व परिसरात आजपर्यंत चार हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करून जागविली आहेत.आज १० ते १५ फुटी झाडे लावली असून जनावरांपासून सुरक्षा साठी ट्री गार्ड ही लावली आहेत.पुढेही सहा दिवस ही वृक्षरोपण मोहीम सकाळी ७ ते आठ पर्यंत राबविण्यात येणार आहे.तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे व दहेगाव सामाजिक कार्यकर्ते संदीप डांगे यांनी केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते दशरथ तूपे यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी काळजी घेणारे डॉक्टर मंडळीचे आभार व्यक्त करत डॉक्टर डे च्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी डॉ.पी जी गुंजाळ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर्जेराव मते,राहाता वकील संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय धनवटे, संदिप डांगे,सुभाष आप्पा डांगे,प्रभाकर डांगे,भानुदास जायभाय, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भानुदास गाडेकर,भाऊसाहेब बनकर,दास कुंभकर्ण,संजय बाबर,बबलू फटांगरे,संजय वाघमारे,दिपक दंडवते,मनोज पिपाडा,विलास वाळेकर,अरविंद बावके,सिताराम बावके,उमेश लुटे,राजेंद्र वायकर,पांडुरंग गायकवाड,प्रणव लावर,दशरथ तुपे,डॉ बापूसाहेब पानगव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...