रविवार, ३० जून, २०२४

साईयोग फाउंडेशन द्वारे भानुदास गाडेकर व किरण राऊत यांचा सत्कार....

साईयोग फाउंडेशन द्वारे भानुदास गाडेकर व किरण राऊत यांचा सत्कार....
राहता=
राहाता बसस्थानक ने स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात नासिक विभागात तिसरा क्रमांक पटकावला व दीड लाखाचे बक्षीसही मिळविले.यासाठी कष्ट घेवून पदरमोड करणारे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भानुदास गाडेकर व राहाता बस स्थानक व्यवस्थापक किरण राऊत यांचा साईयोग फाउंडेशन राहाता द्वारे साकुरी येथे माझी वसुंधरा ४-० अंतर्गत १२ फुटी वट वृक्षारोपण करून फेटा बांधून व शाल देवून रुद्य सत्कार करण्यात आला.
साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करत प्रस्तावना करताना राहाता बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भानुदास गाडेकर व किरण राऊत यांनी घेतलेल्या पराकाष्टाचा उहापोह करत हे दोघेही साईयोग फाऊंडेशनचे सन्माननीय सदस्य असल्याचा अभिमान आहे असे नमूद केले.सत्काराला उत्तर देताना भानुदास गाडेकर यांनी राहाता येथे बस डेपो साठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.किरण राऊत यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावातून राहाता शहर जोडले गेल्यास येथील बाजारपेठ फुलण्या बरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयोग होईल.शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे,योगगुरू सुरेश भिंगारदिवे,मोहन तांबे,अरविंद बावके,संजय बाबर,सिताराम बावके,प्रताप गमे,अनिल सातव,संजय वाघमारे,दिपक दंडवते,राजेंद्र बांगर,बबलू फटांगरे,रविंद्र धस,उमेश लुटे,विष्णू गाडेकर,दास कुंभकर्ण,नारायण गाडेकर,शिवाजी पोटे,संदीप डांगे,सुभाष डांगे,बाबासाहेब गुंजाळ,भानुदास जायभाय,बाळासाहेब तारगे,प्रणव लावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...