रविवार, ३० जून, २०२४

महिलांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेणारे शिंदे पहिले मुख्यमंत्री = कमलाकर कोते

*महिलांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेणारे शिंदे पहिले मुख्यमंत्री कमलाकर कोते*

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


२८ जून २०२४ हा दिवस राज्यातील ममहिलांच्या आयुष्यातील जणू सुवर्ण दिवस महिलांच्या आयुष्यातील जणू सुवर्ण दिवसच. महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ ची घोषणा आणि त्यातच महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजनांसाठी करण्यात आलेली तरतूद हे महाराष्ट्र सरकार महिलांच्या सशक्तीकरणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रमाण देते. 
महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महिलांसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची” घोषणा करून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा दिड हजार रुपये लाभ दिला जाणार असून, या योजनेद्वारे राज्यातील सुमारे २ कोटी पेक्षा जास्त महिलांना थेट लाभ देण्याचे ध्येय राज्य सरकारचे आहे, हा निर्णय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. 
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, लेक लाडकी योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांसाठी पिंक रिक्षा, व्यावसायिक शिक्षणासाठी मुलींना फी माफी, २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उदिष्ट अशा अनेक योजना व कल्याणकारी निर्णयांद्वारे श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून खऱ्या अर्थाने महिलांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून क्रांतीपुरुष श्री एकनाथ शिंदे साहेब आमचे नेतृत्व करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे कमलाकर कोते ( शिवसेना जिल्हा प्रमुख
अ नगर उत्तर) म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...