साईयोग फाउंडेशन द्वारे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.
राहता -
राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे रविवारी सकाळी पुण्यशलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ जयंती स्वच्छ्ता अभियान राबवून साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करत सामाजिक उपक्रम राबवून फाउंडेशनद्वारे जातीभेद न करता महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करण्याचा आगळा वेगळा उपक्रम अखंड चालू असल्याचे नमूद केले.तसेच फाउंडेशनद्वारे स्वच्छता अभियान,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन,योग प्राणायाम,सायकल चालवा इत्यादी निसर्ग संवर्धनार्थ राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.अनिल सातव व रविंद्र धस यांनी मनोगत व्यक्त करतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला.शालिनीताई विखे पाटील यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत स्वच्छते बाबत अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे नमूद केले.यावेळी शालिनीताई विखे पाटील यांचा साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच संजय बाबर,सिताराम बावके,विठ्ठल निर्मळ,माजी सैनिक आप्पासाहेब माळवदे,आण्णासाहेब कांदळकर,भास्करराव बावके,बाळासाहेब तारगे यांचा वाढदिवसानिमित्त फेटा बांधून साईशाल व पुष्प देवून सत्कार करण्यात आला.राहाता कृषी उत्पन्न समितीचे सदस्य राजेंद्र धुमसे,दहेगाव चे संदीप डांगे,उपसरपंच संजय डांगे व मनोज पिपाडा यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार किरण वाबळे,दशरथ तुपे,संदीप डांगे,उपसरपंच संजय डांगे,गोरखनाथ दंडवते,विलास वाळेकर,भारत दवंगे,मोहन तांबे,दिपक दंडवते,बबलू फटांगरे,संजय वाघमारे,उमेश लुटे,व्यंकटेश अहिरे,रविंद्र धस,नारायण गाडेकर,शिवाजी पोटे,प्रकाश बेंद्रे,अशोक वाघ,राजेंद्र धुमसे,संदीप डांगे,संजय बाबर,सिताराम बावके,आप्पासाहेब माळवदे,आण्णासाहेब कांदळकर,विठ्ठल निर्मळ,भास्कर बावके,बाळासाहेब तारगे,मनोज पिपाडा आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी सामजिक कार्यकर्ते दशरथभाऊ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा