शुक्रवार, ३१ मे, २०२४

धनगरवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

धनगरवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
धनगरवाडी (वार्ताहर) बाबासाहेब मंडलिक 
 राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर  यांची 299 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रतिमेची पूजन व पुष्पहार धनगरवाडीचे माजी पोलीस पाटील विठ्ठलराव राशिनकर यांनी केले. प्रतिमेला श्रीफळ धनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ खरात यांनी केले. त्यानंतर अहिल्यादेवीनगर येथे अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोडनार हे होते. प्रतिमेचे पूजन व प्रतिमेला पुष्पहार धनगरवाडीच्या ग्रामसेविका सौ प्रियंका शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.  ज्ञानेश्वर माऊली सोडनार, विठ्ठलराव राशिनकर ,उपसरपंच साहेबराव आदमाने ,तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल परसराम रक्टे ,शिवसेना शाखा अध्यक्ष अमोल साखरे आदि मान्यवर उपस्थित होते .त्याच्यानंतर 5 ते 7 अहिल्यादेवी प्रतिष्ठान तर्फे प्रतिमेची मिरवणूक आणि सात ते नऊ ह भ प मधुसुदन महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन हनुमान मंदिर धनगरवाडी येथे झाले. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. माजी उपसरपंच अनिल रक्टे, कारभारी भोंडे ,विलास रक्टे ,केरू नाना रक्टे ,सदाशिव राशिनकर, भाऊसाहेब रक्टे ,संभाजी आदमाने ,अंबादास रक्टे, बाळू राशिनकर ,महेश रक्टे ,गणेश राशिनकर ,अरुण मंडलिक ,श्याम राशिनकर, विलास मंडलिक, बबन रक्टे ,रमाकांत कोते,दीपक आदमाने ,सुंदरबापू तागड ,भाऊसाहेब साखरे ,गोरक्षनाथ रक्टे , नानासाहेब साखरे,संतोष रक्टे इत्यादी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...