शृंगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा 97.82 टक्के निकाल
शिंगवे वार्ताहर - रविंद्र भालेराव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अन्नपूर्णा ग्रामीण क्षेत्र विकास संस्था संचलित शृंगेश्वर माध्यमिक विद्यालयाने याही वर्षी उज्वल निकालाची परंपरा कायम ठेऊन 97.82 टक्के निकाल लागला आहे सन 2023-24 शैक्षणिक वर्षा करीता एकुण 46 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एक अनुत्तीर्ण झाला,
टॉप पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे
ठोंबरे अथर्व उध्दव - 82.80% ( प्रथम क्रमांक)
ठोंबरे सायली गोविंद - 82.40% ( द्वितीय क्रमांक )
काळवाघे अनुजा राजेंद्र - 82.40% ( द्वितीय क्रमांक)
शेळके प्रतिक दगडू - 82.20%( तृतीय क्रमांक)
चौधरी साईशा प्रमोद - 82.00% ( चतुर्थ क्रमांक)
शेळके श्रृती विलास - 81.60 % ( पाचवा क्रमांक)
बर्गे ओंकार सुरेश - 81.60%( पाचवा क्रमांक)
आदी गुणवंत विद्यार्थी पाच मध्ये आले आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाणी यांनी दिली
संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन केले, तर स्कूल कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले आहे
पालकांनी व ग्रामस्थांनी विद्यालयाचे कौतुक करुन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा