गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

शिर्डी ते तिरुपती थेट १८ तासात! दौंड मार्गे सुपरफास्ट रेल्वेची भाविकांची आग्रही मागणी! ३ तीर्थक्षेत्रे जोडणार, १३ तास वाचणार; केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांच्याकडे निवेदन !

शिर्डी ते तिरुपती थेट १८ तासात! दौंड मार्गे सुपरफास्ट रेल्वेची भाविकांची आग्रही मागणी!

३ तीर्थक्षेत्रे जोडणार, १३ तास वाचणार; केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांच्याकडे निवेदन !



नेवासे
 - जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी, शनिशिंगणापूर आणि आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी या तीनही तीर्थक्षेत्रांना जोडणारी दौंड मार्गे नवीन सुपरफास्ट रेल्वे सुरू करावी,अशी जोरदार मागणी भाविकांमधून होत आहे याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
   नेवासे येथील रेल्वे मार्गबाबत येथील भाविक शंकर नाबदे यांनी याबाबत सातत्याने केंद्रिय रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

*वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार!*
सध्या शिर्डीहून तिरुपतीला जाणाऱ्या सर्व गाड्या छत्रपती संभाजीनगर मार्गे जातात. त्यामुळे या प्रवासाला तब्बल २७ ते ३० तास लागतात. तर दुसरीकडे मुंबई-पुण्याहून दौंड मार्गे जाणाऱ्या गाड्या हेच अंतर केवळ १४ ते १५ तासात पार करतात.
   त्यामुळे जर नवीन गाडी शिर्डी - बेलापूर - अहिल्यानगर - दौंड मार्गे सोडली,तर हा प्रवास केवळ १७ ते १८ तासात पूर्ण होईल यामुळे भाविकांचे थेट १० ते १३ तास वाचणार आहेत.

*दौंडमध्ये सर्व सुविधा उपलब्ध*
याबाबत भाविकांचे म्हणणे आहे की,शिर्डी येथे टर्मिनलची अडचण असेल तर ही गाडी अहिल्यानगर किंवा बेलापूर येथून सोडावी आणि तिची देखभाल-दुरुस्ती दौंड जंक्शन येथे करावी.दौंड हा मोठा जंक्शन असून तेथे पिट लाईन व स्टेबलिंगची सर्व सुविधा उपलब्ध आहे.

*खासदारांनी पाठपुरावा करावा*
या मार्गावर नवीन गाडी सुरू झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रेल्वेच्या महसुलातही मोठी वाढ होणार आहे.त्यामुळे शिर्डी व अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी या प्रश्नी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा करावा,अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त होत आहे.


शिर्डी-तिरुपती ही नवीन रेल्वे सुरू झाल्यास शिर्डी, शनिशिंगणापूर व तिरुपती बालाजी या तीन मोठ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा सर्वात कमी वेळेचा मार्ग ठरेल हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी वरदान ठरणार आहे
- विठ्ठल शेटे नेवासा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...