श्री गणेश विद्यालयाची क्रीडा विभागात उत्तुंग भरारी
गणेश नगर
दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी पी व्ही पी महाविद्यालय लोणी या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेतील विद्यार्थी सागर संतोष मदने याने भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला या विद्यार्थ्याचे व पालकांचे मान्यवरांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला . या विद्यार्थ्याची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली
या विद्यार्थ्याचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोजी तोरणे साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक वसावे के के ,स्कूल कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब पांडुरंग गाढवे, स्कूल कमिटीचे सदस्य माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल सोपान गाढवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मीक गाढवे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप गाढवे, सल्लागार समितीचे सदस्य जयाभाऊ काले , राजेंद्र जाधव ,विजय सदाफळ यांनी अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .या विद्यार्थ्याला क्रीडा विभाग प्रमुख धनवडे एस आर , वसावे व्ही आर, कैलास भोये यांचे मार्गदर्शन लाभल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा