मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

लायन्स क्लब राहाता मार्फत वृक्षारोपण व सन्मान सोहळा

लायन्स क्लब राहाता मार्फत वृक्षारोपण व  सन्मान सोहळा

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन श्रेयस दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली वन मंथ वन ग्लोबल कॉज नुसार ऑगस्ट महिन्यात एनवायरनमेंट बाबत उपक्रम करण्याबाबत सांगण्यात आले होते, त्या नुसार लायन्स क्लब राहाता यांनी ५ फुटी ५ नारळ व ५ आंबे ची मोठी झाडे चितळी रोड राहाता येथील चर्च मधे लावण्यात आली.
त्यानंतर स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय सामाजिक पत्रकारिता पुरस्कार, पत्रकर दिलीप खरात यांना मिळाला व तसेच डॉ संजय उबाळे यांना इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ मधील आउटस्टैंडिंग झोन चेअरमन व सामाजिक कामाबद्दल लायन्स क्लब राहाता यांनी दोघांच्या सन्मान मोठ्या थाटात साजरा केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. जी. गुंजाळ, रोटरी क्लब शिर्डी यांना अध्यक्षस्तन राहून बहुमूल्य मार्गदर्शन केले. रोटरी क्लब शिर्डी व लायन्स क्लब राहाता मिळून आपण सामाजिक काम करू, अशी त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संजय गायकवाड उपाध्यक्ष लायन्स क्लब राहाता यांनी केले. या प्रसंगी पत्रकार सतीश वैजापूरकर, राहता प्रेस क्लब चे अध्यक्ष रामभाऊ लोंढे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सर्जेराव मते, राजेंद्र निकले, रवींद्र जोशी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रकाश सदाफळ, त्बळासाहेब सोनवणे,  संदीप वाव्हळ, मुन्नाभाई शाह, राजेंद्र बांगर, अंजली उबाळे, सरला तायडे, श्वेता कारले, स्मिता मुरादे,सविता काळे, सदाफळ ताई, उर्मिला हसे, डॉ मनाली उबाळे, रमेश निकळे, भारूड सर, घेगडमाळ सर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष उमेश शेटे, सेक्रेटरी दिनेश कारले, ट्रेशरर खिजर शाह, संजय गायकवाड, प्रकाश सदाफळ, सोहन उबाळे, सुनील हसे, नवीन काळे, संजय वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन सोहन उबाळे व आभार प्रदर्शन सविता काळे यांनी केले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रम यशश्वी रित्याने पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...