सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

साईयोग फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिलीप खरात सन्मानित

साईयोग फाउंडेशनच्या वतीने  पत्रकार दिलीप खरात सन्मानित


 पत्रकार दिलीप खरात यांना श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने पत्रकारीका क्षेत्रातील  मनाचा स्वर्गीय वसंतराव देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल राहाता येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे साईयोग फाउंडेशन द्वारे रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप खरात यांचा फेटा बांधून श्रीसाई शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 
सुरुवातीला साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना दिलीप खरात यांच्या पत्रकारिकेतील निर्भीड व वास्तव्यवादी वृत्तीचा उल्लेख करत साईयोग फाउंडेशनच्या कार्याचे निस्वार्थपणे नेहमीच कौतुक करण्यासाठी धन्यवाद दिले. .सत्काराला उत्तर देताना पत्रकार दिलीप खरात यांनी साईयोग फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक करत सत्कार केल्याबद्दल आभार मानले. शेवटी नगरसेवक दशरथ तुपे यांनी दिलीप खरात यांच्या कार्याचा गौरव करत सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य राजेंद्र बांगर यांना वाढदिवसानिमित सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते कातनाला परिसरात बांबूचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी योगगुरू सुरेश भिंगारदिवे, साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, पांडुरंग तुपे, ॲड गोरख दंडवते, ॲड दिगंबर धनवटे, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, संदीप डांगे, मनोज पिपाडा, परमेश चव्हाण, अनिल सातव, बबलू फटांगरे, दिपक दंडवते, विठ्ठल निर्मळ,  संजय वाघमारे, दिपक गाडेकर, व्यंकटेश अहिरे, ज्ञानेश्वर आरणे, रंगनाथ सदाफळ, अशोक वाणी, उमेश लुटे, शिवाजी पोटे, नारायण गाडेकर, कैलास चेणुके, बाळासाहेब तारगे, प्रणव लावर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...