सोमवार, २७ जुलै, २०२६

आशा सेविका सौ. राधा गोर्डे यांचा सेवा निवृती सोहळा एक भावनिक क्षण.

आशा सेविका सौ. राधा गोर्डे यांचा सेवा निवृती सोहळा एक भावनिक क्षण.


 संगमनेर तालुक्यातील तळेगाव PHC मधील पहिल्या आशा कर्मचारी सौ. राधा गोर्डे यांचा सेवा निवृती सोहळा तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ मुंगसे यांच्या अध्यक्षते खाली व आशा सुपरवायझर यांचे प्रमुख उपस्थीतीत नुकताच संपन्न झाला.
सौ. राधा गोर्डे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक वर्ष मातृ शिशु आरोग्य लसीकरण जन जागृती ग्राम सेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी योगदान दिले.
कोराना काळात स्वताच्या जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन त्यांनी कोरोना रुग्नाची सेवा केली.
या प्रसंगी आशा कर्मचारी संघटनेच्या कॉम्रेड उषा दिघे यांनी सेवा निवृत्ती नंतर आशा कर्मचारी यांना शासनाने कुठलेही आर्थिक सहाय्य केले नाही या विषई आपली खंत बोलून दाखवली.
आशा कर्मचारी निवृत्त झाल्या नंतर तिला शासनाने पेंशन नाही तर किमान अंगणवाडी सेविके प्रमाने एकलाख रुपये द्यावे म्हणजे तिला भविष्यात त्या रकमेचा आपल्या स्वताच्या गरजा भागविता येतील असे त्या म्हणाल्या.
आशा कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ . सुधिर टोकेकर यांनी सौ राधा गोर्डे यांना सेवा निवृतीच्या शुभेच्छा संदेश पाठऊन आपल्या भावना कळविल्या.
आशा कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे यांनी सेवानिवृत्त झालेल्या आशांन साठी शासन स्तरावर संघटना करत असलेल्या पेंशन अथवा एक रकमी काही तरी मोबदला मिळावा या साठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगुन सौ. गोर्डे यांना सेवा निवृत्ती नंतर दिर्घ आयुआरोग्याच्या शुभेच्छा आपल्या शुभेच्छा संदेशात दिल्या.
सौ राधा गोर्डे या क्षणांनी सर्व आशा कर्मचारी यांनी दिलेल्या शुभेच्छा व निरोप यांनी भावना विवष झाल्या होत्या.
त्यांनी या प्रमा बद्दल सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास ओ एन एम श्रीमती एम . पी माळी श्रीमती कदम श्रीमती तांदळे श्रीमती पुजा बांगर श्रीमती अंजली मिसाळ आहेर मॅडम मंगल सोनवणे मंगल वाणी प्रतिमा सुपेकर मंगल गायकवाड सविता डोंगरे तसेच तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्तरगातील सर्व आशा सेविका उपस्थीत होत्या. शेवटी आशा सुपरवायझर सौ. आरती चांडोले यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...